बालक बनले मोटारसायकल चोर !!

बालक बनले मोटारसायकल चोर !!

        (वार्ताहर - प्रद्युमन देशपांडे)

ए रित्या..सुनरैला क्या बे तू.. ? 

भैंचोद साले इधर कू आ । 

ये लो बीस रूपया..जा अपने कू आधा पकिट सिगरेट ला..! " रोहित्या त्याच्या टपोरी भाषेत रितेश ला बजावत होता.

 अभी लायेगा भिडू.. ! 

रितेश पैसे घेऊन पटरी वर निघाला .


रोहित , रितेश सोबात अजून अन्य दोन मित्र.. शाळा काॕलेज जड वाटू लागलेलं..शिक्षण सोडून दिलं पण चैनीत जगण्याचे भूत कांही केल्या मनावरून उतरले नाही ! त्यासाठी मिसूरडं नुकतंच फुटलेल्या या पोरांना ऐशो आराम साठी वाट्टेल ते करण्याची सवय लागलेली होती .


 अपून के पास एक पलान ( प्लान ) है भिडू..एक और गाडी उठाना माँगता है. . ." 

रोहित वयाने मोठा असल्या कारणे तो या चौकडीचा स्वयं घोषित बाॕस होता .


गेल्या दोन तीन वर्षा पासून यांचे हे नित्यकाम झालेले...

मोटार सायकल , मोपेड या सारख्या गाड्या हे चौघे चुटकी सरशी कुणाला ही संशय न येता उचलत असायचे..


दि 22 / 05 / 2022  ! 

अनुपम यादव थकल्या भागल्या शरिराने पेल्हार पोलिस स्टेशन मध्ये आला .

चेहऱ्यावर हताश भाव स्पष्टपणे कर्तव्यावर असलेल्या पोलिस निरिक्षकाला दिसत होते . पणतरी ही सयंम ढळू न देता अनुपम कांही बोलण्याची वाट पहात होते .


' नमष्कार सर..! 

सर माझी गाडी सकाळ पासून जिथे पार्क केली होती, तिथून गायब झाली हो..' मानेवरचा घाम पुसत अनुपम क्षीण आवाजात बोलला. . .

पोलिस निरिक्षक महाशय दिवसभराचा लेखा जोखा लाॕग बुक मध्ये नोंद करीत होते . त्यांनी एक नजर अनुपम वर टाकली..

" कोण आहे रे तिकडे ? 

यांना ग्लासभर पाणी द्या " 

पो नि सरांनी आदेश दिला .

दिलेले पाणी अनुपम चे गटागट पिऊन झाले. मिनीटभरात तो शांत झाला .

नंतर...

" हं सांगा साहेब ! 

काय हकीकत आहे ? " 

इंस्पेक्टर बोलले .

अनुपम ने इत्यंभूत माहिती सांगितली . त्या नंतर , 

" हं साहेब..जा घरी आता .आराम करा !  मी उद्या तुम्हाला बोलावून घेतो .

पाहू..आपण शर्थीचे प्रयत्नं करून तुमच्या होंडा अॕक्टिवा चा शोध लावू.." 

पुरेपूर दिलासा दिल्या नंतर अनुपम माघारी परतला .

इकडे..

निरिक्षक महोदयांनी स्वतःच्या मोबाईल वरून तीन चार फोन लावले.. अन् शेवटी तपासाचा धागा सापडला .

तत्पुर्वी , अनुपमची शिकायत गुन्हा रजि. नं ४४४ /२०२२ , भा दं वि सं कलम ३७९ प्रमाणे नोंदविण्यात आली .

घटना अशी की ,  एम एच ०४ / इ जी ४८६९ या क्रमांकाची अनुपम रामदुलार यादव वर ३५ वर्ष यांची होंडा अॕक्टिवा कमलाकर चाळ , शनिमंदिर मागे , तुंगारेश्वर मंदिर रोड , तुंगार फाटा , वसई ता. वसई , जिल्हा पालघर येथून चोरीस गेली होती .


मिळालेल्या गुप्त माहिती नुसार इंस्पेक्टर महाशय आपल्या इतर सहका-या सोबत कामगिरीवर निघाले..


गोडाऊन च्या पाठिमागे एका उंच ओट्यावर रोहित सिगारेट चे झुरके घेत इतर तिघांना बोलत होता..

" तुम तिनो कू मै बोलरैला हुँ । आपून के पास अभी अगर हिसाब लगाए तो दो पेटी के उपर पैसा जमा हुयेला है । हिसाब तुम तिनों में बराबर का और मेरे कू पच्चीस हजार ज्यादा का होयेगा । " 

चौघे ही चोरलेल्या गाड्यांच्या पैशाचा हिशेब लावण्यात मग्न होते..

पण हळूच दबक्या पावलाने मागून येत इंस्पेक्टर साहेबांच्या टीम ने अचानक झडप टाकली आणि चौघांनाही ताब्यात घेतले .

त्यांना गाडीत टाकून पेल्हार पोलिस स्टेशन मध्ये दि ३०/०५/२०२२ रोजी, एक अॕटोरिक्षा, सात मोटार सायकली अश्या एकूण २२५०००/- च्या मुद्देमालासह  आणन्यात आलं. . .

वया नुसर पहाता रितेश जंजाळ आणि सौरभ कोवळे होते .

त्या चौघांना कटघरात डांबलेलं होतं.. इंस्पेक्टर आत येताच रितेश च्या कानशिलात खाडकन् ठेऊन दिली.. त्या नंतर काठीचे प्रहर लगावण्यात आले. रितेश आणि सौरभवर पि सी आर होताच ते कबूल झाले .

अनुपम च्या होंडा अॕक्टिवा सोबत इतर सात मोटार सायकील चा ही छडा लावण्यात आला .

रोहितकुमार गौड वय २१ 

विनयकुमार पटेल वय १९ 

सौरभ यादव वय  २२ 

रितेश जंजाळे वय १९ 

या चौघांनी गुन्हा कबूल केला .


वरिल सर्व आरोपितांकडून खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले .


१ ) पोलिस ठाणेः पेल्हार

गुन्हा रजि. नं ४४४ / २०२२

भा दं वि सं कलम ३७९ प्रमाणे ( मुळ गुन्हा )


२) पो. ठाणेः  पेल्हार 

गुन्हा रजि. नं  ३६९/ २०२२ 

भा दं वि सं कलम ३७९ प्रमाणे


३) पो. ठाणेः पेल्हार 

गुन्हा रजि. नं ४६०/ २०२२

भा दं वि सं ३७९ प्रमाणे 


४) पो. ठाणेः वालीव 

गुन्हा रजि. नं ४२३ / २०२२

भा दं वि सं ३७९ प्रमाणे


५) पो. ठाणेः वालीव 

गुन्हा रजि. नं ५५० / २०२२ 

भा दं वि सं ३७९ प्रमाणे


६) पो. ठाणेः वालीव 

गुन्हा रजि. नं ५५२ / २०२२

भा दं वि सं ३७९ , ३४ प्रमाणे


७) पो. ठाणेः माणिकपूर

गुन्हा रजि. नं १८५ / २०२२

भा दं वि सं ३७९ प्रमाणे


८) पो. ठाणेः माणिकपूर

गुन्हा रजि. नं १८५ / २०२२

भा दं वि सं ३७९ प्रमाणे


सदरची कामगिरी , 

     श्री प्रषांत वाघूडे पोलिस उपायुक्त , परिमंडल - ३ , विरार श्री रामचंद्र देशमुख सहाय्यक पोलिस उपायुक्त विरार विभाग यांच्या मार्गदार्शनाखाली श्री विलास चौगुले वरिष्ठ पोलिस निरिक्षक पेल्हार पो. ठाणे , श्री अमर मराठे पोलिस निरिक्षक ( प्रशाशन ) व पेल्हार पो. ठाणे गुन्हे प्रकटीकरन शाखेचे पो. उप निरिक्षक सानिल पाटील , पो. हवा योगेश देशमुख , तानाजी चव्हाण , पो. ना प्रताप पाचुंदे , पो. अमल. संदिप शेळके , मोहसिन दिवाण , सचिन वळीव , पो. हवा योगेश देशमुख , तानाजी चव्हाण , पो. ना प्रताप पाचुंदे  , संदिप शेळके , मोहसिन दिवाण , सचिन वळीव , बालाजी गायकवाड , किरण आव्हाड , रोशन पुरकर यांनी यशश्वीपणे पार पाडली आहे.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे