जसलोक हॉस्पिटल व्यवस्थापनाला निशिकांत शिंदे यांचा दणका !

जसलोक हॉस्पिटल व्यवस्थापनाला निशिकांत शिंदे यांचा दणका !

 कामगाराला काही कारणाने गैरहजर राहावे लागल्यास किंवा कामावर यायला उशीर झाल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाते, याच छळणुकीला कंटाळून सचिन खरात या कामगाराने आत्महत्या केली होती, जसलोक रुग्णलयातील कामगारांचा मानसिक छळ थांबावा, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कठोर कारवाई होऊ नये, अन्याय होऊ नये अशा विविध मागण्यांसाठी सोमवार १३ जानेवारी भारतीय कामगार सेनेच्या वतीने अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांच्या सूचनेनुसार सहचिटणीस निशिकांत शिंदे यांच्या शिष्ट मंडळाने जसलोक रुग्णालयावर धडक दिली. या दणक्याने हादरलेल्या व्यवस्थापनेने भारतीय कामगार सेनेच्या सर्व मागण्या मान्य केल्या.  

 खरात याच्या मृत्यूला जबादार असणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, खरात कुटुंबातील एका व्यक्तीला कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी, खरात यांनी रुग्णालयात सेवा केल्यापासून ते ५८ वर्षांपर्यंत त्यांच्या कुटुंबाला आर्थिक लाभ देण्यात यावेत अशा मागण्या निशिकांत शिंदे यांच्या शिष्ट मंडळाने केल्या, याबाबतचे लेखी पात्र एच आर विभागाचे संचालक सुनील करंदीकर यांना देण्यात आले, त्यांनी या मागण्या मान्य केल्या. सदरच्या बैठकीत शिवसेना विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ, संपर्क प्रमुख सिंधुदुर्ग-कोल्हापूर अरुण दुधवडकर, शाखाप्रमुख सिद्धेश माणगावकर, युनियनचे प्रतिनिधी भापाजी सौदरवा, सिकंदर आढाव, दिनेश सागठिया, किशोर राठोड, किरण जोईल, मुकेश राठोड, रवी परमार, किरण गोयील, अशोक धाकडा, केतन जोगडिया, जगदीश सौदरवा, शिल्पा मकवाना आणि कार्यालय प्रमुख राजेश मजगुणकर उपस्थित होते. 


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week