महाराणा प्रताप चौक बस थांबा की खाऊ गल्ली- पार्किग !!

महाराणा प्रताप चौक बस थांबा की खाऊ गल्ली- पार्किग !!

      महाराणा प्रताप चौकातून विविध ठिकाणी जा-ये करण्यासाठी बस प्रवाशांसाठी बस प्रशासनाने बस वाहतूकीची सोय उपलब्ध करून दिलेली आहे.

       माँन्जिनीज युनिक स्टोअर्स लगतच फुथपाथला बस रूट नं. ३,६०,१२६,१३४ चा बस थांबा आपल अस्तित्व टिकवून, प्रवाश्याच्या प्रतिक्षेची की आजूबाजूच्या व इतर ठिकाणच्या नागरिकांच्या पार्किंगची सोय म्हणून बाजूच्या खाऊ गल्लीच्या दुकानाच्या गिराईकाची गैरसोय होऊ नये, म्हणून ओळखीचे ठिकाण सांगण्याची खूण म्हणून उभा ठाकला आहे. बस प्रवाश्यांच्या सोयीसाठी बस थांबा असावा, की खाऊ गल्ली-पार्किंगची सोय व्हावी म्हणून या थांब्याची उभारणी केली आहे. 

       वस्तू व सेवाकर विभागातील व परिसरातील प्रवाश्यांच्या सोयीसाठी असणारा हा बस थांबा मोकळा श्वास केव्हा घेईल. 

          या बस थांब्यावरून बस नं १३४ भायखळा व्हाया लालबाग मार्गे शिवडी कडे प्रस्थान करते. संध्याकाळी चाकरमान्यांना आपल्या घरट्यात सुखरूप लवकर पोहचण्यासाठी बस रूट नं १३४ ची वेळेत अधिक बसची उपलब्धता करून द्यावी. आज दि.०९/०५/२०२२ ला संध्याकाळी ५.४० ते ७.१५ पर्यत बसचं उपलब्ध नव्हती. त्यामुळे गैरसोय झाली. ही नित्याचीच बाब झाली आहे. ह्या अगोदर पर्यायी मार्ग म्हणून लालबाग चे प्रवाशी  बस नं ४३ चा वापर करायचे, पण बस प्रशासनाने कोणत्या परिक्षणाअंती ही बस बंद केली. त्यामुळे ह्या मार्गावरील प्रवाशाचे हाल झाले, होत आहे. तरी बस प्रशासनाने ह्या ज्वलंत प्रश्नाकडे गंभीरतेने पाहून सदर प्रश्न मार्गी लावावा.

            सुनिल गोपाळ पांचाळ                             लालबाग,मुंबई-४०००१२.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week