
लोअरपरळ विभागासाठी मनसे आक्रमक होण्याची शक्यता ?
महाराष्ट्र नवनिर्माण सेना युवा नेतृत्व श्री. अमोल शशिकांत देसाई शाखा अध्यक्ष प्रभाग 198 लोअर परळ यांनी पश्चिम रेल्वे विभागीय व्यवस्थापक मा.सत्या कुमार यांची भेट घेतली सोबत उपशाखा अध्यक्ष शैलेश आहिर व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते, दरम्यान अनेक विषयांवर चर्चा केली त्या मध्ये प्रामुख्याने
1) लोअर परळ उड्डाणपूलाचे काम तातडीने पूर्ण करावे
2) लोअर परळ रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रं 1 वर (एक ) व प्लॅटफॉर्म क्रं 2 वर (दोन) टॉयलेट उपलब्ध करून देणे
3) प्रथमोपचार केंद्र व बचत मेडिकल
4) सर्व सूचना फलक मराठी भाषेत करणे व इतर विषय
हे सर्व विषय लवकरच मार्गी लावू अशी ग्वाही विभागीय व्यवस्थापक यांनी दिली आहे.