
वसईत सकाळ पासून अवकाळी पावसाची रिपरिप!
आजकाल वातावरण इतकं बदललं आहे की नेमका कोणता ऋतू सुरू आहे हे समजणं मुश्किल होऊन बसलंय,
काल पासून वसई तालुक्यात वातावरण ढगाळ होत. समुद्र किनाऱ्यालगत वसई असल्याने थंड हवाही अगदी पावसाळी हवे सारखी फेकत आहे.
आज सकाळी ही वातावरण अगदी ढगाळ, पावसाळी होत व थोड्याच वेळात पावसाला सुरुवात झाली १५ मिनिट जोरदार पाऊस कोसळला. अजूनही वातावरण ढगाळ असून सूर्यदर्शन झालं नाही आहे. पावसाची बारीक रिपरिप सुरू आहे. टेम्प्रेचर १६ डिग्री च्या खाली असून हवेत खूप गारवा ही आहे.