
संक्रांतीच्या पतंग उत्सवावर मीरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालयाच्या वतीने काही निर्बंध लागू, नायलॉन मांजा चा वापरावर बंदी !!
संक्रांतीच्या पतंग उत्सवावर मीरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालयाच्या वतीने काही निर्बंध लागू, नायलॉन मांजा चा वापरावर बंदी !!
संक्रांत म्हटलं म्हणजे नवीन वर्षाचा पहिला सण, उत्तर प्रदेश, राजस्तान, मध्यप्रदेश ह्या राज्यात नवीन वर्षाची सुरवात संक्रांती पासून होते, ह्या राज्यात संक्रांतीला q असे संबोधले जाते, महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात, आणि महाराष्ट्रात मकर संक्रांती पासून महिलांचे हळदी कुंकुवाचे कार्यक्रम घराघरात, तसेच गल्ली बोळात मोठ्या उत्साहाने साजरे होतात.
मकरसंक्रांतीच्या पर्वावर दरवर्षी मुंबई ठीक ठिकाणी पतंग उत्सवाचे आयोजन करण्यात येते. इतक्या वर्षच्या निरीक्षणात असे दिसून आले की पतंगासाठी जो मांजा वापरण्यात येतो त्यात नायलॉन च्या मांजा चा सर्रास जास्त वापर होतो, आणि ह्या नायलॉनच्या मांज्यामुळे पक्षी व मानवी जीवितास इजा झालेली आहे. नायलॉनचा मांजा हा प्लास्टिक किंवा कृत्रिम वस्तूंचा वापर करून बनविण्यात आलेला अनाशवंत असल्याने तो बराच कालावधी करिता निसर्गात साचून राहतो. त्यामुळे पर्यावरणास हानी पोहचते. नायलॉन चा मांजा हा जमिनीवर तसाच पडून राहिल्याने, विशेषतः गाई, म्हशी यांच्या पोटात जाऊन त्यांच्या जीवितास घोका होऊ शकतो, कटलेल्या पतंगाचे मांजे हे बऱ्याच प्रमाणात झाडावर अडकलेले असतात बऱ्याच वेळेस झाडावर बसणारे पक्षी त्या मांजात फसतात व त्यांचे पंख कापले जातात, मुंड्या कापल्या जातात.
त्यामुळे मानवी जीवितांचे व पशु पक्षांचे नायलॉन मांजा पासुन संरक्षण करणे गरजेचे आहे. वसई विरार येथे विद्युत पुरवठा अजूनही खांबावरून होत आहे. तसेच नायलॉन मांजा हा पतंग उडविण्याच्या दसरम्यान विद्युत वहिनी, तसेंच उपकेंद्रे या ठिकाणी अडकुन विद्युत पुरवठ्यामध्ये समस्या निर्माण करू शकतात. त्यामुळे कोणतेही अपकृत्य होऊ नये या करीता पोलीस उप आयुक्त मुख्यालय श्री विजयकांत सागर मीरा भाईंदर वसई विरार यांनी मीरा-भाईंदर, वसई -विरार ह्या कार्यक्षेत्राकरिता फौजदार प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१), (२) अन्वये दिनांक ५/१/२०२२ रोजी १ वाजे पासून ते दिनांक ३/२/२०२२ २४ वाजे पर्यंत, नायलॉन मांजाचे उत्पादन, साठा, विक्री व वापर करण्यास मनाई आदेश लागू केले आहेत.