काशिमिरा वाहतूक विभागा मार्फत दुसऱ्या टप्प्यातील ११२ बेवारशी वाहनांची व्हिलेवाट लावण्याची प्रक्रिया राबवणात येणार !!

काशिमिरा वाहतूक विभागा मार्फत दुसऱ्या टप्प्यातील ११२ बेवारशी वाहनांची व्हिलेवाट लावण्याची प्रक्रिया राबवणात येणार !!

        रोड पार्किंगवर गल्ली, छोटे लिंक रोड अथवा रस्त्यावरही अनेक ठिकाणी काही वाहने वर्षानुवर्ष पार्किंग मध्ये उभी असलेली दिसतात. अशा वाहनांचे वारस असतात, की नसतात, हे ही वर्षनुवर्षं माहीती पडत नाही. अश्या बेवारशी वाहनांची व्हिलेवाट लावण्याची प्रक्रिया काशिमीरा वाहतूक विभागातर्फे राबविण्यात येणार आहे. 

          मीरा-भाईंदर, वसई-विरार   आयुक्तालयातील काशिमिरा वाहतूक विभागाचे कामकाज सुरू झाल्यानंतर त्यांच्या कार्य क्षेत्रातील रस्त्यावर वर्षानुवर्षे बेवारस स्थितीत पडलेली वाहने, अनेक दिवस रस्त्याच्या कडेला लावून ठेवलेली वाहने, पादचाऱ्यांना चालण्यास व वाहतुकीस अडथळा करीत असलेली वाहने तसेच महानगरपालिका सफाई विभागास साफसफाई करताना त्या वाहनांचा नेहमी अडथळा होत असतो. अशी बेवारस वाहने रस्त्यावर उभी असल्यामुळे सफाई  कामगारांना देखील योग्य रित्या रस्त्याची साफसफाई करता येत नाही. त्यामुळे वाहनांखाली अवती भवती कचरा साठून अस्वच्छता आणि रोगराई निर्माण होण्याची खूप शक्यता निर्माण झाली आहे.  

        अशी बेवारस वाहने काशीमिरा  वाहतूक विभागाकडून ताब्यात घेऊन महानगरपालिका प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या कनकिया लक्ष्मी पार्क, मिरारोड पूर्व येथे, बंदिस्त सर्व्हे क्रमांक २५१ या जागेत ठेवण्यात आली आहेत.

        सदरची प्रक्रिया ही  सुमारे गेल्या १० वर्षांपासून सतत चालू असून आता पर्यंत मोठ्या संख्येने विविध प्रकारची वाहने ठेवण्यात आली आहेत. वाहनांच्या भरमसाट झालेल्या गर्दीमुळे, सदरचा परिसर पूर्णतः व्यापला असून जागा अपुरी पडत चालली आहे.

      वाहतूक पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सदर बेवारस वाहनांपैकी  ११२ मोटारसायकल, ह्या पूर्ण गंजून गेल्या असून त्यांचे इंजिन क्रमांक, चेसिस क्रमांक, तसेच त्यांचा रजिस्टर क्रमांक मिळून येत नाही. 

      या बाबत नागरिकांना अवगत होण्यासाठी स्थानिक वृत्तपत्रात, प्रसिद्धी माध्यमांमध्ये प्रसिद्धी देण्यात येत आहे, बेवारस वाहनांचे मालक, हक्कदार यांनी त्यांच्या मूळ कागदपत्रांसह वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काशीमिरा परिमंडळ-१  मिरा-भाईंदर, वसई-विरार, पोलीस आयुक्तालय यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मिरा-भाईंदर, वसई-विरार, पोलिसां मार्फत करण्यात येत आहे. या आवाहनाच्या अनुषंगाने १५ दिवसांत विनादावा असलेल्या ११२ वाहनां बाबत दावा, अथवा मालकीहक्क सिद्ध न झाल्यास त्यांच्या निर्गतीची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी