रेल्वे स्थानकात ३७ हजार जणांचे लसीकरण !

रेल्वे स्थानकात ३७ हजार जणांचे लसीकरण !

     वसई- विरार महापालिकेने रेल्वे स्थानकात सुरू केलेल्या लसीकरण मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या लसीकरण मोहिमेत आता पर्यंत ३७ हजार ४४७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. वसई- विरार महापालिकेकडून सुरवातीला शहरातील विविध ठिकाणच्या भागात लसीकरण करण्यास सुरुवात केली होती. त्या पाठोपाठ आता पालिकेने नागरिकांच्या सुविधेसाठी कार्यक्षेत्रात येणाऱ्या वसई, विरार, नालासोपारा, नायगाव या रेल्वे स्थानकात १८ नोव्हेंबर पासून लसीकरण मोहीम सुरू केली आहे. 

      रेल्वे स्थानकातच लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सकाळपासून ते संध्याकाळ पर्यंत लसीकरणासाठी नेमलेल्या परिचारिका यांच्यामार्फत रेल्वे स्थानकात ये-जा करणारे प्रवासी आहेत त्यांचे लसीकरण केले जात आहे.

      अवघ्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये ३७ हजार ४४६ जणांना लसीकरणाच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. यात १० हजार ४१६ जणांना लसीची पहिली मात्रा तर २७ हजार ३० लसीची दुसरी मात्रा घेतली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.भक्ती चौधरी यांनी दिली आहे.

      पालिकेने रेल्वे स्थानकातच ही सुविधा  उपलब्ध करून दिल्याने काही नागरीक नागरी केंद्रावर न जाता आता थेट रेल्वेस्थानकातच लसीकरण करवून घेऊ लागले आहेत.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी