वसई नालासोपारा दरम्यान रूळाला तडा !!

वसई नालासोपारा दरम्यान रूळाला तडा !!

      वसई पश्चिम रेल्वे वरील वसई नालासोपारा दरम्यान रेल्वे रूळाला तडा गेल्याने सकाळच्या सुमारास लोकल सेवा काही काळ विस्कळीत झाली होती.

होती.मंगळवार दिनांक ९ सकाळी साडे नऊच्या सुमारास झालेल्या घटने मुळे लोकल १५ ते २० मिनिट उशिरा धावत होत्या.

   पश्चिम रेल्वेवर अनेक दिवसापासून तांत्रिक बिघाड वाढत आहेत. बुधवार दिनांक १०  रात्री १२.३० ते पहाटे ४.३० वाजे पर्यंत वसई रोड आणि विरार स्थानका दरम्यान अप डाऊन धिम्या मार्गिकेवर चार तासाचा ब्लॉक घेतला होता. मात्र ब्लॉक अगोदरच रूळाला तडा गेला असल्याने प्रवाश्यांमध्ये संतप्त वातावरण निर्माण झाले होतें.



Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी