
मुंबईकरांना मिळणार पन्नास हजार कोविशिल्ड वॅक्सिंन !
मुंबईत लसीचा तुटवडा लक्षात घेता, कित्येक नागरिक लसी पासून वंचित असून केंद्रावर पहाटे पासून रांगा लावूनही लस उपलब्ध होत नाही. या बाबत नुकतेच, पर्यावरण पर्यटन व राजशिष्ट्राचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार वरळीचे माजी आमदार- सुनिल शिंदे, भा.का. सेना सहचिटणीस - निशिकांत शिंदे, यांची संयुक्त चर्चा आयोजित करण्यात आली. सुनिल शिंदे व निशिकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नाने, देबोशीष सिटी कंपनीच्या मदतीने मुंबईकारांना पन्नास हजार कोविशिल्ड वॅक्सिंन देण्यात येणार असल्याचे चर्चेत मंत्री आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले. चर्चेत डॉ. सचिन नायर, विशाल गुप्ता जितेंद्र हरियान उपस्थित होते.