
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या जनहित याचिकेची आज सुनावणी !
राज्यातील पत्रकारांना फ़्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळावा, त्यांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा मिळावी व त्यांचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करावा म्हणून मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र विश्वनाथराव वाबळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली जनहित याचिका आज गुरुवार दि.५ ऑगस्ट २०२१ रोजी मुख्य न्यायाधीश व न्या. जी.एस. कुलकर्णी यांच्या खंडपिठापुढे सुनावणीसाठी येणार आहे. (अनु. क्र. १०) पत्रकार संघातर्फे डॉ.अॅड.निलेश पावसकर युक्तिवाद करतील.