
बीडीडी चाळींच्या पुनर्विकासामध्ये माजी आमदार सुनील शिंदे यांची मोठी भूमिका !
बीडीडी चाळींच्या पुनर्विकासामध्ये माजी आमदार सुनील शिंदे यांची मोठी भूमिका !
डिलाईल रोड, वरळी, ना म जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प होत असून त्याचे उद्घाटन नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच स्थानिक आमदार पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या समारंभात इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते हा प्रकल्प गेल्या अनेक वर्षापासून सुरू होणार होता. परंतु तो आज अस्तित्वात आला असून त्यामुळे बिडीडकर नागरिक यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी शासकीय दरबारी तसेच विविध प्रशासनाच्या दरबारी गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे तत्कालीन आमदार सुनील शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करन अनेक बैठकी देखील घेतल्या. त्यांच्या या मेहनतीचे हे यश असून हा प्रकल्प पूर्ण होण्यामध्ये त्यांचा फार मोठा खारीचा वाटा असल्याची भावना येथील नागरिकांनी व्यक्त केली.
हा प्रकल्प आज खऱ्या अर्थाने सुरू झाला असून त्यांचे खरे श्रेय हे तत्कालीन आमदार सुनिल शिंदे यांचे आहे. आता आम्हाला हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून द्यावा. मंत्रीमहोदयांनी सांगितल्याप्रमाणे पुढील तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होईल आणि आम्हाला घराच्या चाव्या मिळतील अशी आशा येथील नागरिकांनी आणि वरळीकर नागरिकांनी व्यक्त केली.