
ज.मो. अभ्यंकर यांच्या हस्ते शहापूर येथे वृक्षारोपण सोहळा साजरा !!
ज.मो. अभ्यंकर यांच्या हस्ते शहापूर येथे वृक्षारोपण सोहळा साजरा !!
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित प्रेरणा पंधरवडा अंतर्गत वृक्षारोपण सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जात आहे. या मालिकेचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना ठाणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय विभागातर्फे २७ जुलै रोजी शहापूर तालुक्यातील धर्मसेवक डॉ. सोन्या पाटील आदिवासी माध्यमिक विद्यालय बामणे व डॉ. एस. एम. गायकवाड विद्यालय, शिदपाडा, शेणवे येथे वृक्षारोपणाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रम अंतर्गत १००० वृक्षरोपण करण्याचे ध्येय ठेवून कामाला सुरवात करण्याचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना राजाध्यक्ष तथा अप्लसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमात शंभराहून अधिक सक्रिय कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. पहिल्याच दिवशी सुमारे २५० झाडे लावण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भिवंडीचे समाज कल्याण न्यासचे अध्यक्ष श्री. सोन्या पाटील यांनी येथील मराठी माध्यमाच्या शाळेस मिनीबस दान करून विध्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा सुरु केली. तसेच ३०० विध्यार्थ्यांना गणवेश वाटप केले.
या प्रसंगी ज.मो. अभ्यंकर व श्री. चिंतामण वेखंडे यांनी बोधपर मार्गदर्शन केले व डॉ. एस. एम. गायकवाड विद्यालय, शिदपाडा चे मुख्याध्यापक श्री. नरेश सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. गुरुदत्त एज्यकेशन सोसायटीचे श्री. मनोज गोंधळी, श्री. मेनेसर, श्री. अनिल चौधरी, कविता पडवळ, मुख्याध्यापक श्री.धनाजी धसाडे यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मोलाचे योगदान केले. या कार्यक्रमास अनेक पदाधिकाऱ्यांनी सहभाग दर्शविला. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे मा. श्री. चिंतामण वेखंडे, राज्य, श्री. नितीन चौधरी, श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे, श्री विशाल बावा, श्री. जगदीश भगत, श्री. मंगेश पाटील, अध्यक्ष श्री. डॉ. संतोष महादू गायकवाड, श्री.अर्जुन उगलमुगले, श्री नंदकुमार वाघचौर, श्री. राम घावट, श्री.अविनाश देशमुख, श्री. दत्तात्रेय विशे उपस्थित होते.