मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यंदा भराडीदेवी आंगणेवाडी यात्रेला भेट देणार का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यंदा भराडीदेवी आंगणेवाडी यात्रेला भेट देणार का?

    (वार्ताहर - अभिजीत पेठे) मालवण तालुक्यातील आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा 17 फेब्रुवारी रोजी होत आहे. यावर्षी निवडणुका झाल्यामुळे  यात्रेत उच्चांकी गर्दी होण्याची शक्यता आहे. मसुरे ग्रामपंचायत, आंगणेवाडी ग्रामस्थ आणि प्रशासनाने या यात्रेचे नियोजन केले आहे.

या यात्रेत प्रामुख्याने राजकारणी मंडळी देवीला साकडे घालतात. विधीमंडळात, महानगर पालिकेत सदस्य असलेले सर्वाधिक राजकारणी मूळचे सिंधुदुर्गातील आहेत. ते सर्व आपापल्या लवाजम्यासह यात्रेला आवर्जून हजेरी लावतात. यावर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या यात्रेत सहभागी होणार असल्याची शक्यता आहे.अन्य नेत्यांचा दौरा कार्यक्रम अद्याप आलेला नाही. तथापि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवीला साकडे घालण्याच्या निमित्ताने यावर्षी गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणूकीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडून आलेल्या १८ शिवसेना खासदारांसह आंगणेवाडीला भेट दिली होती.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week