
मनसेतर्फे सौ.स्नेहलताई सुधीर जाधव यांनी पूरग्रस्त खेड बाजारपेठेची केली पाहणी !
मनसेतर्फे सौ.स्नेहलताई सुधीर जाधव यांनी पूरग्रस्त खेड बाजारपेठेची केली पाहणी !
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच शर्मिलाताई राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपाध्यक्षा सौ.स्नेहलताई सुधीर जाधव यांनी मनसे सरचिटणीस व खेड नगरपरिषद नगरअध्यक्ष श्री.वैभव खेडेकर यांच्या सोबत खेड बाजारपेठ परिसरात पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी केली व कुंभारवाडा गावातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत केली. त्यासोबतच अलसुरे गावातील मुस्लिम बांधवांना सुद्धा मदत करण्यात आली, त्या गावचे सरपंच, उपसरपंच यांना तेथील ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये साहित्य सुपूर्त केले. त्यावेळी दापोली उपजिल्हा अध्यक्ष सचिन गायकवाड, म.न.वि.से उपजिल्हा अध्यक्ष, साईराज देसाई आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.