सामान्यतः आपल्याला ठाऊक नसलेली मनोरंजक सामान्य ज्ञान माहिती

सामान्यतः आपल्याला ठाऊक नसलेली मनोरंजक सामान्य ज्ञान माहिती

‘अगामा’ ही आफ्रिका खंडामध्ये सर्वत्र खडकाळ वाळवंटि प्रदेशात आढळणारी पालीची जात आहे.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘अगाउ’ ही इथिओपियन पठाराच्या उत्तर व मध्य भागांमध्ये आढळणारी प्रचीन जमात आहे.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘अग्नाथा (हल्लींची अगौटी)’ ही अमेरिकेतील विषुववृत्तीय भागात आढळणारी घुशीची जात आहे.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘एअरंडेल टेरिअर’ हीटेरिअर जातीच्या कुत्र्यांची सर्वात मोठ्या आकारांची जात आहे.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘जिओव्हानी आग्नेली’ हे फियाट मोटर कंपनीचे संस्थापक होते.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘अ‍ॅग्न्स डेई’ हे येशू ख्रिस्ताचे ख्रिश्चन धर्मोपासनेतील संबोधन आहे.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘जॉर्जियस अ‍ॅग्रिकोला’, या जर्मन शास्त्रज्ञाला ‘खनिजशास्त्राचे जनक म्हणतात.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘केप अ‍ॅगुल्हास’ हे आफ्रिका खंडाचे दक्षिण टोक आहे.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘अ‍ॅलागोआस’ हे ब्राझिलमधील दुसऱ्या क्रमांकाचे छोटे राज्य होय.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘अलोड्गपाया’ हेम्यानमारचे (ब्रह्मदेशाचे) शेवटचे शासक राजघराणे होते.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

सर जॉन विलियम आल्कॉक यांनी, ब्रिटिश वैमानिक आर्थर ब्राऊन यांच्या सोबतीने अटलांटिक महासागर एका दमात पार करणारे उड्डाण सर्वप्रथम करण्याचा विक्रम केला.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

अनॅक्सागोरस या ग्रीक तत्त्वज्ञाने ग्रहणामागचे खरे कारण प्रथम शोधून काढले.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

अ‍ॅनक्सिमांडर या ग्रीक तत्त्ववेत्त्याला खगोलशास्त्राचा संस्थापक मानतात.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘उर्सुलाईन ऑर्डर’ हे रोमन कॅथालिक चर्चच्यामहिला पथकांतील (ऑर्डर) सर्वात जुने असून ते शिक्षणकार्याला वाहिलेली आहे.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘आईल ऑफ अ‍ॅंग्लेसी’ हे इंग्लंडचे सर्वात मोठे बेट होय.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘अ‍ॅनिमिझम’ म्हणजे मानवीव्यवहारांमध्ये रस घेऊन त्यात बदल घडवून आणू शकणाऱ्या अतिमानवी / आध्यात्मिक शक्तीवरील विश्वास होय.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘अ‍ॅंटी-अ‍ॅटलास’ ही मोरोक्कोमधील एक पर्वतराजी आहे.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘अ‍ॅटोफॅगास्टा’ हा चिलीमधील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा भूप्रदेश आहे.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

आफ्रिकेतील एका रानटी मेंढीच्या जातीचे ‘औदाद’ हे नाव आहे.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

प्राचीन अथेन्समधील पहिल्या ‘सरदार सभेचे’ नाव ‘अ‍ॅरिओपॅगस’ हे होते.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

आंतरराष्ट्रीय भू-उपग्रहाचे सर्वप्रथम नाव ‘एरियल’ हे होय. ब्रिटन व अमेरिका यांनी १९६२ मध्ये संयुक्तपणे अवकाशात पाठवला होता.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

अ‍ॅबिसिनियन ही इजिप्तमधील पाळीव मांजराची एक जात आहे.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

अ‍ॅंटिमकासार म्हणजे खुर्चीच्या पाठीवर किंवा सोफ्याच्या उशावर टाकलेले संरक्षक आच्छादन

तुम्हाला ठाऊक आहे काय?

अ‍ॅंटपिपिटा हा एक रंगाने व आकाराने यामध्ये पिपिटा पक्ष्याशी साम्य असलेला दक्षिण अमेरिकी पक्षी आहे.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘अनुबिस’ हा प्राचीन इजिप्शियन संस्कृतीमधील मृतात्म्याचा देव होय.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘अग्नी’ हे पूर्व आयव्हरी कोस्ट आणि घाना या विषुववृत्तीय देशांमधील आफ्रिकन आदिवासी होत.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘अ‍ॅंपोथिअ‍ॅसिस’ याग्रीक ‘अ‍ॅपोथिअम’ या शब्दापासून झालेल्या प्रक्रियेमध्ये मानवाचे देवपदाकडे उत्थान होते.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘अप्पिअन वे’ हा रोमपासून कँपानियापर्यंत जाणारा रोमन साम्राज्यातील सर्वात जुना व प्रसिद्ध रस्ता होता.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

अमाकिही हा हवाईमध्ये सर्वत्र आढळणारा तद्देशीय गाणारा पक्षी आहे.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘अ‍ॅक्वारेल’ म्हणजे जाड मिश्रण न करता पातल, पारदर्शक, जलरंगांमध्ये चित्र रंगवण्याचे तंत्र होय.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

अरबी मूळाक्षर पद्धती ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची उपयोगात आणली जाणारी लेखनपद्धती आहे.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘अली कॅटाडो’ म्हणजे बहुकोणीय रंगीत फरश्याची आकर्षक जुळवणी.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

फ्रान्सुआ अरागो या फ्रेंच पदार्थविज्ञान शास्त्रज्ञाने अचुंबकीय वाहकाच्या भिरभिरण्यातून उत्पन्न होणाऱ्या चुंबकत्वाचा शोध लावला.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

अ‍ॅमिगड्यूल म्हणजे अग्न्युत्पादक पाषाणांच्या आतील लांबट, गोल किंवा बदामाकृती पोकळीमध्ये आढळणारे खनिजांचे दुय्यम थर.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

अ‍ॅंफिक्टियोंनी म्हणजे प्राचीन ग्रीसमधील कुठल्याही धर्मक्षेत्रांच्या सभोवतालच्या शेजारी राज्यांचा मित्रसंघ.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

ऑलस्पाईस ही वेस्ट इंडीज आणि मध्य अमेरिकेमध्ये आढळणारी विषुववृत्तीय सदाहरित झाडाची जात.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

आल्टामिरा केव्हज ही स्पेनमधील गुंफा इतिहासपूर्वकालीन भव्यलेणी आणि भित्तीचित्रे यांसाठी प्रसिद्ध आहे.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

अ‍ॅमालेकाईट म्हणजे बायबलच्या जुन्या करारामध्ये ‘इम्राएलचे शत्रू’ म्हणून वर्णिलेल्या प्राचीन भटक्या जमाती पैकी माणूस.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

अ‍ॅलोडियम म्हणजे कोणत्याही वरिष्ठाच्या मेहरबानीशिवाय स्वतंत्रपणे ताब्यात असलेली जमीन.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

निकोलस (फ्रान्सुआ) अ‍ॅपर्टा या फ्रेंच माणसाने अन्न हवाबंद डब्यांबध्ये बंद ठेवून अन्न टिकविण्याच्या पद्धतीचा शोध लावला.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

अल्माजेस्ट हा टॉलेमीने संकलित केलेला खगोलशास्त्रीय व गणितीय ज्ञानकोश आहे.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

अ‍ॅलिगेटर अ‍ॅपल हे उत्तम लाकडासाठी नावाजलेले विषुववृत्तीय अमेरिकेतील एक फळझाड आहे.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

व्हासिली आयव्हॅनोविच अल्क्सेयेव्ह या सोव्हिएट संघाच्या वेटलिफ्टरने १९७० ते १९७८ या कालखंडामध्ये ७९ जागतिक विक्रम प्रस्थापित केले.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

आल्बम म्हणजे प्राचीन रोममध्ये सार्वजनिक सूचना काळ्या रंगात लिहिण्यासाठी ठेवलेला पांढरा फलक.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

आल्बियन हे ब्रिटन या बेटाचे सर्वात जुने उपलब्ध नाव होय.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

अलेक्झांडर रोमान्स (लीला) हे नाव अलेक्झांडर द ग्रेट याच्या प्रचलित असलेल्या अनेकांपैकी कुठल्याही कथेला दिले जाते.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

टेन्ली ऑल्ब्राईट ही जागतिक हौशी खेळाडूंच्या फिगर स्केटिंगमध्ये अजिंक्यपद मिळविणारी पहिली अमेरिकन महिला.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

कोनराड अडेनायर हे जर्मन संघराज्याचे पहिले चॅन्सेलर होते.

तुम्हाला ठाऊक आहे काय?

अलान्टॉईस म्हणजे सरपटणारे प्राणी. पक्षी व सस्तन प्राणी यंच्या आतड्याच्या शेवटच्या टोकातून बाहेर येणारी अतिरिक्त गर्भत्वचा.

तुम्हाला ठाऊक आहे काय?


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week