चित्र नव्हे अस्त्र !!
जगात सगळीकडे थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसचे दर्शन घडवणारे आणि हतबल झालेल्या जगाचे एक वास्तव दाखविणारे चित्र लोअरपरळ मुंबई येथे राहणाऱ्या दिपेश देवदास ने काढलेले आहे.
मालवणी व्हर्जन ऑनलाइन चित्रकला 2020 स्पर्धेत कोरोना विषयावर दिपेश देवदास सावर्डेकर याने काढलेले एक सुंदर चित्र खरोखरच मनाला भिडणारे आहे. ह्या ऑनलाइन चित्रकला स्पर्धेमध्ये लोअरपरेल विभागातल्या या मुलाचा पहिला नंबर आला आहे, तरी कु. दिपेश देवदास सावर्डेकरचे विभागातल्या सगळ्या नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
बहुजन विकास आघाडी वॉर्ड क्र. २१ ने आयोजित केलेल्या स्पर्धेच्या सर्व विजेत्यांचे व स्पर्धकांचे आभार आयोजक तेजस कांबळी यांनी मानले आहेत.