फालूदा पाककृती

फालूदा पाककृती

गरमीमध्ये थंडावा आणण्यासाठी आणि मुलांचा आवडता पदार्थ फालूदा घरच्या घरी बनवू शकता.

जिन्नस


२ कप व्हॅनिला आईस्क्रिम

१ कप फालूदा शेव

गुलाबाचे सरबत

अर्धा कप ताजे क्रीम

१ किलो दूध

२ छोटे चमचे गुलाब एसेंस

१/२ कप बदाम व पिस्ते

चार चमचे साखर

पाककृती


दूधात साखर टाकून आटवा. थंड झाल्यावर त्यात गुलाब एसेंस टाकून जमवा.

वाढतांना एक आईस्क्रिम ग्लासात गुलाब सरबत टाकून मग फालूदा शेवया टाका त्यावर जमवलेले दूध टाका.

मग व्हॅनिला आईस्क्रिम टाका व क्रीम टाकून वर बदाम पिस्ते टाका.

किंवा यामध्ये तुम्हाला आवडणारा आईस्क्रीम फ्लेवर, इसेंस घालून त्याची चव वाढवू शकता.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week