
वरळी विधानसभेतील शिवसेना शाखेस मोफत ऑक्सिजन कंसंट्रेटर देणार - कामगार नेते निशिकांत शिंदे
वरळी विधानसभेतील शिवसेना शाखेस मोफत ऑक्सिजन कंसंट्रेटर देणार - कामगार नेते निशिकांत शिंदे
कामगार नेते निशिकांत शिंदे यांच्या वतीने युवासेना प्रमुख, पर्यावरण, पर्यटन तथा राजशिष्टाचार मंत्री, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वरळी विधानसभेतील नागरिकांच्या आरोग्यासाठी वरळी विधानसभेतील शिवसेना शाखेस ऑक्सीजन कंसंट्रेटर देण्यात येणार आहे. त्याचे लोकार्पण आदित ठाकरे यांच्या हस्ते वर्षा बंगला येथे करण्यात आले. यावेळी वरळीचे माजी आमदार सुनील शिंदे, युवासेना उपसचिव सिद्धेश शिंदे, युवासेना मुंबई समन्वयक गणेश सुर्वे, विशाल गुप्ता उपस्थित होते.