
२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन !
आजकालच्या धकाधकीच्या, संगणकीय युगात कधी काय होईल हे सांगता येत नाही. भारतीय तत्वज्ञान आणि भारतीय शास्रांबद्ल आधुनिक जगाला नेहमीच कुतूहल आणि आदर वाटत आला आहे. विज्ञानाची प्रगती होत असताना भारतीय शास्त्रामधल्या, आदिमानवाच्या काळातील रूढी आणि परंपरांच्या मार्फत मांडलेल्या, सध्याच्या वैज्ञानिक युगात, सत्याचा जगाला उलघडा होत असतानाच आपल्या प्राचीन योगशास्त्राचा साधेपणा, शरीर रचनेची सुसंगत मांडणी, एखादी व्याधी निवारण्यासाठी निसर्गोपचाराचा व योगाभ्यासाचा प्रकृती व वयाचा विचार करून प्रभावीपणे वापर करण्याची कल्पकता, शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक असा चहूबाजूंनी केलेला विचार, व्याधी होऊच नये म्हणून करण्यात आलेली प्रतिबंधात्मक उपाययोजना, तसेच योगाभ्यास हा साधू संन्याशांपूरता मर्यादीत न राहता त्याची व्याप्ती, आपल्या पूर्वजाचे हे शास्त्र अधिकाअधिक सामान्यजनतेपर्यत विनामूल्य पोहचविण्याचे मोलाचे कार्य विविध संस्थेमार्फत करण्यात येते. या संस्थेचे सेवाभावी योग शिक्षक "निष्काम" सेवेअंतर्गत योगावरील आपली निष्ठा व्यव-त करण्यासाठी योगाचा प्रचार-प्रशिक्षण ही आपली नैतिक जबाबदारी स्विकारून, आपला समाज निरोगी व निरागस करण्यासाठी, योगाभ्यासाचा आपल्याकडील ज्ञानाचा खजिना, सर्व सामान्य व्यव-तीला देण्याचे मोलाचे कार्य, निरंतर करीत असते. योगाभ्यासाद्बारे आयुष्याची गुरूकिल्ली सर्वापर्यत पोहचवण्याचे महत्वाचे कार्य विविध संस्थेमार्फत होत असते. हे सर्व लक्षात घेऊन "२१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन" म्हणून साजरा केला जातो.
-:- सुनिल गोपाळ पांचाळ -:-