शंभराव्या वंध्यत्व उपचार केंद्राचे उद्घाटन करून ‘इंदिरा आयव्हीएफ’ ठरली भारतातील पहिली मोठी संस्था !!
शंभराव्या वंध्यत्व उपचार केंद्राचे उद्घाटन करून ‘इंदिरा आयव्हीएफ’ ठरली भारतातील पहिली मोठी संस्था !!
भारतात सर्वात मोठी वंध्यत्व निवारण विशेषोपचार केंद्रांची साखळी असलेल्या ‘इंदिरा आयव्हीएफ’ने उत्तर प्रदेशमधील सुलतानपूर व पंजाबमधील भटिंडा येथे दोन नवीन केंद्रे सुरू केली असून संपूर्ण भारतात 100 केंद्रांची स्थापना करण्याचा एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ही संस्था गेल्या एका दशकाहून अधिक काळ अनेक जोडप्यांना त्यांचे कुटुंब वाढविण्याच्या स्वप्नांना साकार करण्यात मदत करीत आहे. 100 वंध्यत्व उपचार केंद्रे चालविणारी ही भारतातील पहिली ‘सिंगल-स्पेशालिटी’ वंध्यत्व उपचार केंद्रांची साखळी आहे.
एका विशिष्ट उद्देशाने चालणारी अग्रगण्य संस्था म्हणून, ‘इंदिरा आयव्हीएफ’ने देशाच्या अगदी दुर्गम भागांमध्ये आयव्हीएफ उपचार उपलब्ध करून दिले आहेत. वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेल्या या उपायांमुळे, विशेषतः दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीतील शहरांमधील गरजूंना मोठी मदत मिळते. अनेक जोडप्यांना या उपचारांसाठी नियमितपणे लांबवर प्रवास करावा लागत असतो. ‘इंदिरा आयव्हीएफ’ची उपचार केंद्रे लगतच्या भागात उपलब्ध झाल्याने त्यांना दिलासा मिळतो, तसेच आर्थिकदृष्ट्याही त्यांना ते परवडणारे ठरते. या मार्गाने ‘इंदिरा आयव्हीएफ’ने सन 2011 पासून 85 हजार जोडप्यांना गर्भधारणेचा आनंद मिळवून दिला आहे. त्यातूनच तिने या व्यवसायातील आपण अग्रेसर संस्था असल्याचे आणि तसेच भारतातील सर्वात विश्वासार्ह सिंगल-स्पेशालिटी वंध्यत्व उपचार केंद्रांची साखळी असल्याचे सिद्ध केले आहे.
संस्थेच्या या प्रवासाबाबत बोलताना ‘इंदिरा आयव्हीएफ’ समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. अजय मुर्डिया म्हणाले, “एक दशकापूर्वी आयव्हीएफ उपचारांची सुरुवात करण्याअगोदर, आम्ही 1988 मध्ये वंध्यत्व चिकीत्सा क्लिनिक सुरू करून, त्याबरोबर शुक्राणू पेढीही (स्पर्म बॅंक) सुरू केली. आमच्या व्यवसायाची वाढ आणि वर्षानुवर्षे आम्ही मदत करू शकलेल्या जोडप्यांची संख्या पाहता, आयव्हीएफ आणि वंध्यत्वाकडे पाहण्याच्या समाजाच्या दृष्टिकोनात बदल झाल्याचे स्पष्ट दिसून येते. अधिकाधिक लोक आपल्या आरोग्याच्या समस्यांसाठी आमचे वैद्यकीय उपाय निवडत असल्याचे पाहून या प्रवासाचा एक भाग असल्याचा आम्हाला आनंद होतो.”
‘इंदिरा आयव्हीएफ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी व सह-संस्थापक डॉ. क्षितिज मुर्डिया म्हणाले, “आमचे शंभरावे केंद्र सुरू करताना, पालकत्वाचे स्वप्न पाहणाऱ्या आणखी अनेक जोडप्यांना मदतीचा हात देण्यास आम्ही सक्षम होऊ, या विचाराने आम्हाला आनंद होत आहे. या महत्त्वाच्या टप्प्याबरोबरच, आम्ही हजारो लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा सतत प्रयत्न करू इच्छितो. आमच्या या निरंतर उपक्रमाचा एक भाग म्हणून, आम्ही देशाच्या पूर्व आणि दक्षिणेकडील भागांत व्याप्ती वाढविण्याची योजना आखली आहे. परवडणाऱ्या किंमतीत अत्याधुनिक आयव्हीएफ सुविधा पुरवण्यासाठी आग्नेय आशियातील आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विस्तार करण्यासही आम्ही उत्सुक आहोत.”
‘आयव्हीएफ’ तंत्रज्ञानाच्या प्रगतीबद्दल बोलताना ‘इंदिरा आयव्हीएफ’चे संचालक आणि सह-संस्थापक नितिज मुर्डिया म्हणाले, “आयव्हीएफचा लँडस्केप अनेक पटींनी बदलला आहे आणि आज यातील जोखमीचे घटक कमी करणारे व चांगले परिणाम सुनिश्चित करणारे अनेक तंत्रज्ञान उपलब्ध आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या (एआय) सहाय्यक पुनरुत्पादक तंत्रज्ञानामध्ये नवनवीन प्रगती नियमितपणे होत आहे. पालकत्वाच्या प्रवासात जोडप्यांना लाभदायक ठरेल, अशा कोणत्याही प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी, इंदिरा आयव्हीएफमध्ये आमचे दरवाजे नेहमीच खुले असतात.”
या सर्व घडामोडींसोबतच, ‘इंदिरा आयव्हीएफ’ला ‘टीए असोसिएट्स’कडून 2019 मध्ये लक्षणीय स्वरुपात मायनॉरिटी इन्व्हेस्टमेंट प्राप्त झाली. टीए असोसिएट्स ही अमेरिकेतील बोस्टन येथील अग्रगण्य ग्लोबल ग्रोथ प्रायव्हेट इक्विटी फर्म आहे. त्या गुंतवणुकीनंतर ‘इंदिरा’चे आयव्हीएफ केंद्रांचे जाळे आणखी वाढले व ते 40पर्यंत पोहोचले. तंत्रज्ञानाला पाधान्य देणारी आणि आयव्हीएफ केंद्रांचे देशातील सर्वात मोठे जाळे असल्याचा अभिमान बाळगणारी इंदिरा, आज पालकत्वाच्या किचकट आणि अनेकदा कंटाळवाण्या प्रक्रियेतून जावे लागणाऱ्या असंख्य जोडप्यांना आधार देणारा आधारस्तंभ आहे.
‘इंदिरा आयव्हीएफ’विषयी :
इंदिरा आयव्हीएफ ही भारतातील सर्वात मोठी वंध्यत्व स्पेशालिटी क्लिनिक साखळी आहे. 2000 हून अधिक कर्मचारी असलेली तिची देशभरात 100 उपचार केंद्रे आहेत. ‘इंदिरा आयव्हीएफ’मध्ये दरवर्षी सुमारे 30 हजारांहून अधिक आयव्हीएफ प्रक्रिया करण्यात येतात. ही संख्या देशात सर्वात जास्त आहे.
वंध्यत्वाबद्दलचे गैरसमज, कलंक, मिथक आणि चुकीची माहिती दूर करण्यासाठी इंदिरा आयव्हीएफ एक जबाबदार संस्था या नात्याने सतत प्रयत्नशील असते. प्रजनन उपचारासाठी प्रतिभा विकसीत व संवर्धन करणे, यासाठीदेखील इंदिरा आयव्हीएफ कटिबद्ध आहे. हे काम पुढे नेण्यासाठी ‘इंदिरा फर्टिलिटी अॅकेडमी’च्या माध्यमातून ती समविचारी संस्थांशी सहकार्य करते. या क्षेत्रातील ‘इंदिरा आयव्हीएफ’ची कामगिरी व संभाव्यता पाहून, टी. ए. असोसिएट्स या अमेरिकेतील आघाडीच्या जागतिक इक्विटी फर्मने 2019 मध्ये ‘इंदिरा आयव्हीएफ’मध्ये गुंतवणूक केली आहे.