स्त्रीशक्ती
स्त्रीशक्तीचा महिमा अपरंपार
दोन्ही घरांचा करी उद्धार
राणी झाशीची लक्ष्मीबाई
रणांगणावर शत्रुला लढा देई
थोर आहे माऊली जिजाबाई
स्वराज्याच्या संस्काराने घडवले राजे शिवाजी
स्त्रीशिक्षणासाठी लढा देई सावित्रीबाई फुले
दगड, शेणाचा मारा सहुन करी कर्तव्य पुरे
भारतात आल्या मदर टेरेसा
अनाथ, गोरगरीब आणि रुग्णांची करावया सेवा
स्त्रीशक्तीचा महिमा अपरंपार
शक्ती, संस्कार, कर्तव्य, माणुसकीचा आहे सार