एकटेपणा !!
माणसांच्या दुनियेत एक गोष्ट नक्की घडली
माणसं माणसात राहूनही एकटी पडली...
घर आहे दार आहे, नाती गोती सगळी आहेत
आपापल्या कामा मध्ये ते सगळेच व्यस्त आहेत...
सांगावं खूप काही मनात खूप साठलं आहे
बोलावं कुणाशी कठीण प्रश्न पडला आहे...
मनातल्या साऱ्या व्यथा मनातच राहतात
तुडुंब साचलेल्या मग डोळ्यातून वाहतात...
आपल्याच माणसांकडून भावनांचा खून होतो
हक्काच्या माणसासाठी म्हणून शोध सुरु होतो...
संपत्ती पैसा आडका मोह यांचा उरत नाही
एकटेपण माणसाला कधीच सहन होत नाही...
भेटतातही काही जन मन भरून बोलतात
आपल्याच नकळत कधी आपले होऊन जातात..
हवसे नवसे गवसे इथे सगळे प्रकार असतात
ज्याच्या त्याच्या मर्जीने सारी नाती जुळतात...
प्रत्येकाने प्रत्येकाचा मान ठेऊन राहावं
माणूस आहोत आपण मनासारखं वागावं.....
माणसातला एकटेपणा माणसानेच घालवावा
दोन शब्द बोलून एक माणूस कमवावा....
धन दौलत सारी शेवटी इथेच राहणार आहे
खाली हात आलो तसे खाली हातच जाणार आहे....
Gurunath---