
पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा बंद !!?
दिनांक २४: गेले सहा महिने बंद असलेले मुलांचे शाररीक वर्ग (शाळा) करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आल्या होत्या व ऑनलाईन वर्ग चालू करण्यात आले होते.परिस्तिथी हळू हळू सुरळीत झाली होती, तसेच करोनाची लसही आली आहे. ह्या सर्व अनुषंगाने इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतचे मुलांचे शाररीक वर्ग दि.२७ जानेवारी पासून सुरू केले होते. काही शाळेत एक दिवस आड करून मुलांच्या दोन बेचेस मध्ये ठराविक अंतराचे पालन करून वर्ग सुरू केले होते.
परंतु काही दिवसांपूर्वी करोनाची लाट पुन्हा महाराष्ट्रात आली आहे. लोक ठराविक अंतराचे पालन करीत नाहीत त्यामुळे करोना पुन्हा वाढला आहे ! अश्या बातम्या ऐकू येत आहेत. ह्या सर्व परिस्तिथी मूळे पालघर जिल्हा आयुक्तांनी पालघर जिल्यातील सर्व शाळा बंद करण्याचे आदेश दिले. ह्या अनुषंगाने वसई विरार महानगर पालिका तसेच जिह्यातील इतर शाळा मध्ये महानगर पालिका द्वारे जी.आर. पाठवुन शाळा त्वरित बंद करण्याचे आदेश वी.वि.एम.सी. वसई विरार महानगर पालिकेने शाळांना दिले आहेत. व दुसरा जी.आर.येई पर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्यास सांगितले आहे.
त्यामुळे दुसरा जी.आर येई पर्यंत पालकांनी आपल्या मुलांना शाळेत न पाठवण्याचे मेसेज शाळांनी सर्व पालकांना दिले आहेत. सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद झाल्या ! मुलांच्या शिक्षणाचे काय? करोना जाईल की नाही? की मुलांना शाळेस मुकावे लागेल ! तसेच सहा महिने शाळा बंद होत्या तरी खाजगी शाळा संपूर्ण वर्षाच्या फी ची मागणी करीत आहेत. अश्या अनेक विचारांच्या प्रतिक्रिया पालकांद्वारे उमटत आहेत..!!!