ll खंत ll
ll खंत ll
बगळे पांढरे शुब्र इथे सर्वच दिसतात.
ओळखणे कावळ्यांना आता अवघड झाले !
लढतो आम्ही आमच्या हक्कासाठी
न्याय मिळणे आता अवघड झाले!
रस्त्यावर उतरलो आम्ही
प्राण गमावले आम्ही निष्ठुरांना आता जगवणे अवघड झाले !
धुंद आहेत सारे मद्यांच्या धुंदीत खुर्चीच्या आड दुःख आमचे दिसायला अवघड झाले आता एवढीच प्रार्थना करतो आम्ही तुला देवा !
तू आहेसच हे भारत मातें पण तुझ्या लेकरास लेकरांना ओळखणे
आता अवघड झाले.!
(कवी - संदीप गायकवाड)