
वरळी शिवाजी नगर वसाहत येथिल पायऱ्यांची डागडुगी !
वरळी पोलीस वसाहत येथील शमा कॉटर्सच्या इमारतींच्या बाजूने शिवाजी नगर वसाहत येथे जाण्यासाठी त्या रस्त्याचा वापर शाळेतील मुले, महिला, जेष्ठ नागरिक करत आहेत. सध्याच्या स्थितीत त्या पायऱ्या जिर्ण अवस्थेत आहेत. त्या पायऱ्यांची डागडुगी करून द्यावी तसेच पायऱ्या चढण्यासाठी जेष्ठ नागरिक व महिलांसाठी रॅलिंग बसवून द्यावी. अशी विनंती तेथील स्थानिक नागरिकांनी युवासेनेकडे केली होती.
वरळी युवासेना उपविभाग अधिकारी श्री.अभिजित पाटील यांनी त्याबाबत दखल घेऊन आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता श्री.कारंडे यांना सांगितल्या नंतर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री.म्हात्रे व श्री.साळुंके यांना सदर घटनास्थळी जाऊन पाहणी करून तात्काळ काम करण्याबाबत सांगितले त्यांनी घटनास्थळी येऊन सदर कामाला सुरुवात केली त्याबद्दल पाटील यांनी त्यांचे आभार मानले आहेत.