मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न !

मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न !

            दि, २६ जानेवारी रोजी मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालय वाहततुक शाखा यांनी प्रजासत्ताक दिन मोठया दिमाखात साजरा केला. ध्वजा रोहण हे नेहमी कुणीतरी खास व्यक्ति च्या हातून करतात. वाहतुक शाखेने ह्या वेळेस ए. एस.आय. श्री दिलीप देवराज ह्यांच्या हस्ते ध्वजा रोहण केले. दिलीप देवराज हे ३५ वर्ष पोलीस खात्यात कार्यरत आहेत आणि आता सेवा निवृत्त होत आहेत म्हणून त्यांना झेंडा वंदनाचा मान देण्यात आला. असे सहा.पो.उप निरीक्षक वाहतुक शाखा श्री. रवी परब यांनी  सांगितले. एखाद्या सामान्य व्यक्ती कडून ध्वज रोहण करणे ही खुप मोठी गोष्ट आहे असे मीरा भाईंदर वसईचे आय. पी. श्री शेखर डांब यांनी आपल्या भाषणात सांगितले.

 

           झेंडा वंदना नंतर वाहतूक नियमांचे प्रसार करणारी बाईक रॅली काढण्यात आली. त्यासाठी मुंबईतील ४० बाईकर्स आले होते. तसेच ४० अंमलदार वाहतुक पोलीस यांचा समावेश होता. रॅली वसई ते विरार अशी काढण्यात आली, करोना काळात पोलिस ठाणेचा परिसर नेहमी स्वछ ठेवला म्हणून कार्यक्रमात सफाई कामगार राजेश कापडनिस यांचा सत्कार करण्यात आला.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी