
बेस्ट गाड्या प्रतीक्षा नगर आगारात धूळ खात का पडून आहेत ?
बेस्ट उपक्रमात खाजगी बसगाड्या चालू केल्यापासून बेस्टच्या प्रवासी वर्ग असो बेस्टचा कामगार वर्ग असू अथवा बेस्ट प्रशासन असू द्या त्यामुळे सर्वांनाच रोज वेगवेगळ्या समस्या ना तोंड द्यावे लागत आहे,बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती एकीकडे दिवसेंदिवस खराब होत चालली असतांना प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
आणि त्यामध्ये भर म्हणून बेस्टने वाहतुक विभागांत खाजगी गाड्यांना कंत्राट देऊन त्यामध्ये अजून भर टाकली आहे, बेस्टची प्रतिमा त्यामुळे दिवसेंदिवस मलिन होत चालली आहे.
खाजगी गाडया चालवताना कंत्रादाराला बेस्ट प्रत्येक किलोमीटर मागे पैसे देत आहे. त्यामुळे त्यामध्ये प्रवासी बसू अगर ती रिकामी चालू दे त्यांना काहीही फरक पडत नाही.
बेस्टच्या प्रतीक्षा नगर आगारात साधारण एक वर्षपूर्वी खाजगी मिनी बसची सुरुवात झाली होती, पण आता गेली ९ महिने सदर गाड्या प्रतीक्षा नगर आगारात पडून आहेत. आणि सदर गाडीवर काम करणाऱ्या कंत्राटी कामगार वर्गाला कंत्राटदाराने पगार देखील दिला नाही त्यामुळे प्रतीक्षा नगर येथील मनसेच्या पदाधिकारी वर्गाने सदर बाबतीत कंत्राटदाराला ह्याबद्दल जाब विचारला असता त्यांनी पुढील १० दिवसांत सदर बाबतीत तोडगा काढू असे सांगण्यात आले आहे. सदर ठिकाणी मनसेचे श्री सुनील परब, श्री लवू नर, श्री संदीप शिंदे उपस्थित होते.