माझा शाळेचा बाक !

माझा शाळेचा बाक !

आठवला बाक,

आठवली शाळा,

आठवला वर्ग,

आठवला खडू फळा !१ !

आठवली शाळेची घंटा,

आठवतेय समूह गीत !

आठवली ती मॅच,

आठवली कबड्डीची हारजीत ! २!

आठवले ते गुरु,

आठवली ती पट्टी !

आठवला घरचा अभ्यास,

आठवली घोकम पट्टी ! ३!

आठवली इंग्लिश शब्द भेंडी,

आठवली सहलीतील मस्ती !

आठवली मारलेली ताडी,

आठवली बालदोस्ती !४!

आठवला दहावीचा सेंड ऑफ,

आठवला शेवटचा बाय !

आठवले ते अश्रू,

लिहायचे अजून काय ! ५!

आठवले स्वर्गवासी मित्र,

आठवले ते सोनेरी क्षण !

आठवत असेलच तुम्हाला,

मग भेटायचं ना सर्वजण ! ६ !

    गजा भाऊ लोखंडे


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week