वात्रटिका ~ फुकटचा उपदेश !
माणूस म्हणे कुत्र्याला
कुठे पाहिलं तिकडे तू
करतोस मात्र घाण
जरा रहा माणसावाणी,
वाढेल तुझी शान !
कुत्रा म्हणे माणसाला
खांब अन टायर बघितला
कि आम्हास येते हुक्की
रेल्वे track कडून जाताना
लाज आणता पक्की !
शौचालय बांधायला तुम्हा
सरकार करते ना मदत !
कागदावरच बांधू नका
नेहमीचीच तुमची आदत !
- गजाभाऊ