
पत्रकार रविंद्र भोजने यांना कोरोना योद्धा झुंजार पत्रकार पुरस्कार !
पत्रकार रविंद्र भोजने यांना कोरोना योद्धा झुंजार पत्रकार पुरस्कार !
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दैनिक शिवनेर च्या वतीने सीएसटी येथील मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित कार्यक्रमात कोरोना झुंजार पत्रकार पुरस्कार श्री. रवींद्र भोजने यांना देण्यात आला. कुठल्याही प्रकारची भीती मनात न बाळगता बेधडक कोरोना काळात घरात न बसता सातत्याने आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला चांगली आणि खरी माहिती पोचविण्याचे काम करणाऱ्या पत्रकारांचा दैनिक शिवनेर तर्फे कोरोना झुंजार पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.
सदरच्या कार्यक्रमास माजी गृहमंत्री कृपाशंकर सिंह, आमदार आशिष शेलार, आमदार प्रसाद लाड, भाजप नेते राज के पुरोहित, माजी नगरपाल जगन्नाथराव हेगडे तसेच मुंबई मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुधाकर काश्यप, सेक्रेटरी विष्णू सोनावणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी इतर १५ पत्रकार आणि छायाचित्रकारांना पुरस्कार देण्यात आले.