महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न !
महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न !
शिवसेना पक्ष प्रमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री- उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानुसार, आणि मुंबईच्या महापौर- किशोरी पेडणेकर यांच्या वाढदिवसा निमित्त, शिवडी विधानसभा अवजड वाहतूक सेना व शिवसेना शाखा क्र १९९, यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर, नुकतेच शिवसेना शाखा क्र १९९, चे शाखा प्रमुख- गोपाळ खाडये यांच्या मार्गदर्शनाखाली, कार्यालया जवळ नुकतेच संपन्न झाले.
शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रलेखक, मुक्त पत्रकार- बाळ पंडित यांच्या हस्ते झाले. त्यावेळी शिवडी विधानसभा अवजड वाहतूक सेनेचे अध्यक्ष- अभिषेक पाटील, सचिव- अनिरुद्ध केळसकर सह, सुशांत पाटील, अमित घाडी, प्रसाद जेधे, मनीष पारधी, करुणाल भोईर, भारत भावे, प्रशांत वाळके, करण पाटील, आदर्श म्हस्के, अक्षय गावकर, दिपक जाधव व शिवसेना शाखेचे समृद्धी कोयडे, अंकिता चव्हाण, सिद्धी रेवडेकर, प्रदीप पाटील, व उज्वला मोरवणकर उपस्थित होत्या. रक्त दात्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आली.
शिबिरासाठी, जगजीवन राम हॉस्पिटल (पश्चिम रेल्वे) चे मोनिका ढोलपुरे, राकेश यादव, हरमीत सिंग कोहली, अन्सारी शिरीन व मन्सूरी सबरुणीसा यांचे विशेष सहकार्य लाभले.
ना.म जोशी मार्ग परिसरातील नागरिक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.