लोअरपरळ मधील गँस वितरक एजेंसी येथिल खळबळजनक प्रकार उघड !
नागरिकांच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा अध्यक्ष अमोल देसाई व पदाधिकारी यांनी लोअरपरळ येथील गँस वितरक एजेंसी येथे भेट दिल्यानंतर खळबळजनक प्रकार उघडकीस आला.
घरगुती गॅस सिलेंडर वजनामध्ये तफावत असल्याचे निदर्शनात आल्याने दिलेल्या वजनापेक्षा साधारणतः प्रत्येक सिलेंडर मागे २०० ते ३०० ग्रॅम वजन कमी आहे हे प्रत्यक्षात समोर आले आहे.
दिवसाला अश्या प्रकारे ४०० ते ५०० घरगुती गॅस सिलेंडर वितरीत होतात, ह्या संदर्भात सखोल चौकशी व्हावी व नागरिकांची होणारी फसवणूक थांबली पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली आहे तसेच डिलिव्हरी पोच पावती ही मराठी भाषेत व्हावी ही मागणी सुद्धा आग्रही ठेवली आहे.
सदर प्रसंगी पक्षाचे उपशाखा अध्यक्ष सर्वेश ताठरे, दिनेश निकम व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते