
वरळीच्या जांबोरी मैदानाची डागडुजी !
वरळीच्या जांबोरी मैदान येथे खेळणाऱ्या खेळाडूंकडून तसेच काही मंडळांकडून युवासेना उपविभाग अधिकारी अभिजित पाटील यांना मैदानामध्ये लाल माती टाकून मैदानाची जेसीपी व रोलर च्या सहाय्याने डागडुगी करण व सुशोभीकरण करून देण्याबाबत विनंती करण्यात आली होती.
त्याची दखल घेत पत्रव्यवहार करून अभिजित पाटील यांनी बी.डी.डी चाळीचे व्यवस्थापक श्री. शशिकांत चौधरी, मनपा सहाय्यक आयुक्त श्री. शरद उघडे यांच्या सहकार्याने सदर मैदानाचे सुशोभीकरण करून दिले त्याबद्दल खेळाडूंनी पाटील यांचे आभार मानले.