
शहीद तुकाराम ओंबळे यांच्या वरळीतील स्मृती चौकाचे सुशोभीकरण !
शहीद तुकाराम ओंबळे यांच्या वरळीतील स्मृती चौकाचे सुशोभीकरण !
२६/११/२००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशदवादी हल्ल्यातील दहशदवादी अजमल कसाब याला गिरगाव चौपाटी येथे जिवंत पकडताना मुंबईतील वरळी पोलीस वसाहती मध्ये राहणारे रहिवाशी पोलीस उप निरीक्षक श्री. तुकाराम ओंबळे शहिद झाले. त्यांची स्मृती भावी पिढीच्या स्मरणात राहण्यासाठी तत्कालीन नगरसेवक स्वर्गीय मधुकर दळवी यांनी शहीद तुकाराम ओंबळे यांचे शिल्प चौकात बसवले. त्या शिल्पाच्या परिसरातील लाद्या तुटलेल्या अवस्थेत होत्या तसेच शिल्पाची रंगरंगोटी करणे गरजेचे होते. ही बाब स्थानिक रहिवाशी संतोष कोयेंडे यांनी वरळी विधानसभा युवासेना उपविभाग अधिकारी अभिजीत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्या नंतर पाटील यांनी
जी साऊथ विभागाचे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांना पत्राद्वारे सदर परिसराचे सुशोभीकरण करण्याची विनंती केली. त्यांनतर त्यांनी तात्काळ त्याची दखल घेऊन सदर परिसराचे सुशोभीकरण करून दिले.
त्याबाबत अभिजीत पाटील यांनी सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांचे युवासेनेमार्फत आभार मानले.