वरळी पोलीस ठाण्याचे सुशोभीकरण होणार !

वरळी पोलीस ठाण्याचे सुशोभीकरण होणार !

        आतापर्यंत अनेक खाजगी व सार्वजनिक आस्थापनांचे सुशोभीकरण व नावाची कमान उभारण्याचे उपक्रम समाजात उभारण्याचे आपण पाहिले आहेत पण पोलीस खात्याच्या मालमत्तेचे सुशोभीकरण करण्यावर बऱ्याच सामाजिक संस्थांनी लक्ष दिलेलं कमी बघायला मिळते.

      सद्रक्षणाय खलनिग्रहनाय या पोलीस खात्याच्या ब्रीदवाक्याला महत्व देत शिवसेना युवासेनेचे अभिजित पाटील यांनी वरळी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मा. श्री. सुधीर जांबवडेकर ह्यांची सदिच्छ भेट घेऊन वरळी पोलीस ठाण्याचे सुशोभीकरण व प्रवेश द्वारावर वरळी पोलीस ठाणे या नामाची कमान उभारण्याबाबत चर्चा केली त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. कमलापुरे उपस्थित होते.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week