
वरळी लोटस जेट्टी येथील अतिक्रमणावर तोडक कारवाई !
वरळी येथील लोटस जेट्टी येथे अनेक वर्ष काही लोकांनी अतिक्रमण केले होते याबाबत युवासेना उपविभाग अधिकारी अभिजित पाटील यांनी संबंधित प्रशासनाकडे तक्रार करून पत्रव्यवहार केल्यावर प्रशासनाने त्याची तात्काळ दखल घेऊन अतिक्रमण हटवून तो परिसर स्वच्छ व सुशोभीत करून दिला.
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार, माजी आमदार सुनील शिंदे, प्रभाग समिती अध्यक्ष दत्ता नरवणकर, सहाय्यक आयुक्त शरद उघडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखलाल वर्पे, फिरोज बागवान व महापालिकेचे अधिकारी परब, जालना, बोस, गलांडे, लोहार, मेरिटाईम बोर्डचे बंदर निरीक्षक सुर्वे या सर्वांच्या सहकार्याने सदर तोडक कारवाई करण्यात आली त्याबाबत अभिजित पाटील यांनी महापालिका मेरिटाईम बोर्ड, पोलीस प्रशासन यांचे जाहीर आभार मानले.