वरळी लोटस विभागात किराणा माल व्यापाऱ्याला पोलिसांकडून बेदम मारहाण !!

       कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव थांबविण्यासाठी सरकारी यंत्रणेने प्रथम जमावबंदी नंतर संचारबंदी लावून पुढे लोकडाऊन पण वाढवला, त्यात नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये म्हणून गृहमंत्रांनी पोलिसांना काठीला तेल लाउन उत्तरवल्याचे सर्वत्र पहायला मिळाले आहे. दिवसरात्र नोकरी करून थकलेले पोलीस स्वतः पण कोरोनाग्रस्त होताना दिसत आहेत.

   काही जिल्ह्यांमध्ये पोलीस आणि जनता यांच्यामध्ये संघर्ष देखील आपण बघितला आहे तर काही अरेरावी करणार्यांनी पोलिसांवर उलट हात केल्याच्याही घटना समोर आलेल्या आहेत.

     पण जीवनावश्यक गोष्टी त्यात किराणा माल, दूध, फळभाज्या इतर आवश्यक गोष्टींची दुकाने चालू ठेवायला सरकारने अनुमती दिलेली आहे. ज्याप्रमाणे पोलीस, डॉक्टर, महानगरपालिकेचे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कार्यरत आहेत व त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी सरकार वारंवार जनतेला आवाहन करत आहे.

      त्याचप्रमाणे जनतेला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्यांचे दुकानदारांचे मनोबल पोलिसांकडूनही नको तुटायला ते देखील एक प्रकारे आपला जीव धोक्यात घालूनच लोकांना सेवा देत आहेत.

     पण वरळी लोटस व्ही पी नगर मधील लोटस स्टोर्स ह्या (संदीप कुमार गुप्ता) किराणा मालाच्या व्यापाऱ्याला पोलिसांकडून मारहाण झाल्याची घटना समोर आलेली आहे, काल दुपारी ३ ते ४ वाजता च्या सुमारास खाद्यतेलाची गाडी यांच्या दुकानजवळ आली त्यानुसार संदीप व त्यांचे भाऊ हे दुकानात तेलाच्या पिशव्या उचलून ठेवत होते तेवढ्यात अचानक पोलिसांचे एक पथक तिथे आले व त्यांनी सदर दुकानदाराला बेदम मारहाण केली मारता मारता त्यांची काठी पण तुटली, तेवढे करून पण त्यांचे समाधान झालं नाही, पोलिसांनी त्या दुकानदारांना रस्त्यावर ढोपरावर चालवले, आता प्रश्न असा पडतो की वरळी विभाग असा पण कोरोना विषाणूंच्या रेड झोन मध्ये पडतो त्या अस्वच्छ गल्लीत जमिनीवरून रांगताना कोरोनाची बाधा होऊन त्यांचे जीवन कसे काय धोक्यात येणार नाही ? व त्यांच्यामुळे इतरांना त्याचा संसर्ग कसा होणार नाही ?

        सदर घटनेचा निषेध करण्यासाठी वरळी लोटस - व्ही पी नगर विभागातील दुकानदारांनी दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत पोलीस आम्हाला परत मारहाण होणार नाही व आम्ही दुकाने उघडावीत असे जोपर्यंत लिहून देत नाहीत तोपर्यंत आम्ही बेमुदत बंदच ठेऊ असे तेथील एका व्यापाऱ्याने सांगितले.

        आणि जर दुकानं बंद राहिली तर स्थानिकांना अन्नधान्य रेशन इतर जीवनावश्यक वस्तू मिळणार कश्या ?

       पोलिसांनी देखील आपल्या कामाच्या ताणातुन आलेली निराशा अशा प्रकारे निरपराध लोकांवर काढू नये. कायद्यात नमूद असल्या प्रमाणे बळाचा वापर कुठे व कसा करावा हे पोलीसकर्मींनी जाणुन घेणे जास्त गरजेचं आहे, त्यामुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण होऊन पोलिसांची चांगली प्रतिमा मलिन होऊ लागेल, व सरकारच्या सकारात्मक पावलांवर भूमिकेवर प्रशचिन्ह उभे राहतील ?


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week