
लोअरपरळ, डिलाईड रोड विभागातील नागरिकांची आरोग्य तपासणी : नगरसेविका सौ. स्नेहल आंबेकर
लोअरपरळ, डिलाईड रोड विभागातील नागरिकांची आरोग्य तपासणी : नगरसेविका सौ. स्नेहल आंबेकर
कोरोना विषाणूंचा वाढत चाललेला प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने शिवसेना शाखा क्र.१९८ च्या माध्यमातून लोअरपरळ व आसपास सर्व विभागातील नागरिकांची काळजी घेत घरोघरी जाऊन आरोग्य तपासणीसाठी डॉक्टर उपलब्ध करण्यात आले. विभागातील दत्ता अहिरे मार्ग, ना.मा.जोशी मार्ग, डिलाईल रोड बी.डी.डी चाळ बिल्डिंग सोसायटी व खिमजी नागजी चाळ ते माणिक बिल्डिंग, नगीन नगर येथील रहिवाशांचे आरोग्य तपासणी चालू आहे. सोबत विभागातील कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांची पण आरोग्य तपासणी केली गेली जात आहे.
विभागातील सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे, घरी राहा .... सुरक्षित राहा असे आवाहन नगरसेविका सौ. स्नेहल आंबेकर यांनी केले आहे.