
संभाजी ब्रिगेडच्या वतीने अन्नधान्य वाटप !
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना व्हायरसच्या वाढत जाणाऱ्या प्रसारा विरुद्ध लढण्यासाठी देशातील जनतेला आर्थिक मदत करण्याचे आव्हान केले आहे. त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड दक्षिण मुंबई जिल्हा वतीने वरळी मध्ये जिजामाता नगर, सिध्दार्थ नगर, प्रेम नगर, सुभेदार नगर, आनंद नगर दिनांक 13 एप्रिल 2020 दुपारी 1 वाजता 100 गरजू लोकांना अन्न धान्य वाटण्यात आले, त्यात सुशांत बांधेकर, सागर रसाळ, अजय मोरे व इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.
(जिल्हाप्रभारी- दक्षिण मुंबई जिल्हा
मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड) यांनी सांगितले.