
वरळी पोलीस वसाहतीमधून गरिबांना शिधा वाटप !
कोरोना विषाणूंचा वाढता पादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन कालावधी वाढवल्यानंतर ज्यांचे हातावरच पोट होते अशा लोकांच्या रोजगाराचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, बऱ्याच ठिकाणी गोरगरिबांना अन्नावाचून राहायची वेळ येऊ नये असं वाटू लागलं आहे.
त्यात अनेक सामाजिक संस्था, उद्योगपती, राजकारणी, अभिनेते, दानशूर व्यक्तींनी मदतीचे हात पुढे केलेले आहेत,
त्यात शासनाच्या आदेशांचे पालन करण्यास कुढलीही कसूर न करणारे मुंबई पोलीस देखील मदतीसाठी काही मागे पडलेले नाहीत.
वरळी बी. डी. डी चाळ क्रमांक २३ आणि २४ अशोक क्रिडा मंडळ. ह्या पोलीस वसाहत मधील मंडळाने दूरदर्शन समोरील गल्लीत राहणाऱ्या झोपडपट्टीत गरजू व गरीबांसाठी राहणाऱ्या लोकांना शिधा वाटप केले.