ऑर्किड चित्रकला स्पर्धेत भक्ती गावडे प्रथम क्रमांकाने व प्रज्ञा साळुंके द्वितीय क्रमांकाने विजयी !

ऑर्किड चित्रकला स्पर्धेत भक्ती गावडे प्रथम क्रमांकाने व प्रज्ञा साळुंके द्वितीय क्रमांकाने विजयी !

    मुंबई (आर्थर रोड) : येथे प्रथमच ऑर्किड दि इंटरनॅशनल स्कुल मस्जिद बंदर यांच्या वतीने अथर्व सोसायटी आर्थर रोड येथे ३ ते १३ वर्षातील मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धा दोन गटात घेण्यात आली.

   कुमारी भक्ती गावडे, प्रज्ञा सळूके व अर्पिता चाळके यांना अनु. प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिकने गौरविण्यात आले. तसेच शिशु गटात अविघ्न सातार्डेकर, स्वानंदी मेस्त्री व शिवम तापेकर हे पुरस्काराचे मानकरी झाले. ऑर्किड शाळेच्या वतीने पदक, प्रमाणपत्र व खाऊचे वाटप करण्यात आले. शाळेच्या वतीने अमीन खान यांनी परीक्षण केले व अब्बास सय्यद, रोहित गुप्ता यांनी स्पर्धा  उत्तम प्रकारे सांभाळली. अथर्व गृह निर्माण संस्थेच्या वतीने बाळ पंडित (पत्रकार), रोहिणी नलावडे (अध्यक्षा), राजेंद्र चव्हाण (सचिव), भास्कर साळुंके, सागर मेस्त्री, विशाल मेस्त्री व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week