
वरळी नाक्यावरील अर्धवट पूल पाडला !
वरळी नाक्यावर २०१३ मध्ये मुंबई महापालिका पूल विभागाकडून पादचारी पूल उभारण्यात येणार होता. पुलाचे काही कारणांमुळे काम सुरु होऊ शकले नाही . पुलासाठी उभारण्यात आलेले पिलरचे अर्धवट बांधकाम अनेक वर्ष तेथेच पडून होते, रस्ता ओलांडण्यासाठी त्याठिकाणी पादचार्यांची गर्दी होत होती, त्यामुळे रस्ता ओलांडताना पायला ठेच लागून पडण्याचे प्रकार वारंवार घडत होते, त्याचा पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.
नागरी समस्या मांडण्यात अग्रेसर असलेले युवासेना उपविभाग अधिकारी अभिजित पाटील यांच्या पाठपुराव्याने नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यात आली.
शिवसेना नेते पर्यावरण मंत्री श्री आदित्य ठाकरे नगरसेवक श्री आशिष चेंबूरकर व माजी आमदार श्री सुनील शिंदे यांच्या सहकार्याने सदर अर्धवट बांधकाम महापालिका जी/दक्षिण विभागाकडून तोडण्यात आले असे पाटील यांनी सांगितले.