
वरळीत पदपथावर राहणाऱ्या गरीब व गरजू मुलांना कपडे वाटप !
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रविवार दिनांक ०९/०२/२०२० रोजी वरळी बस डेपो येथे पदपथावर राहणाऱ्या गरीब व गरजू मुलांना कपडे वाटप करण्यात आले.
त्या प्रसंगी विभागप्रमुख नगरसेवक आशिष चेंबूरकर, महिला उपविभाग संघटक ज्योती दळवी, युवासेना सहसचिव राजवी लाड, युवासेना उपविभाग अधिकारी संकेत सावंत, युवती शाखाधिकारी योगिनी सावंत शाखा समन्वयक सचिन साळवे, विधानसभा समन्वयक स्वप्नील नितनवरे, महिला उपशाखासंघटक कल्पना सुर्वे, वैशाली बेकल, युवासेना उपशाखाधिकारी प्रभात यादव, पंकज म्हस्के, ओमकार कात्रे, युवती उपशाखाधिकारी प्रज्ञा चव्हाण, अजहर सैयद आदी शिवसैनिक उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन अभिजित पाटील युवासेना उपविभाग अधिकारी वरळी विधानसभा, आकर्षिका पाटील युवासेना युवती विभागाधिकारी वरळी विधानसभा यांनी केले होते.