सासुचा निर्घुण खुन करणा-या फरारी आरोपीस १३ वर्षानंतर चेन्नई येथून अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष २ वसई यांना यश !!
सासुचा निर्घुण खुन करणा-या फरारी आरोपीस १३ वर्षानंतर चेन्नई येथून अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष २ वसई यांना यश !!
मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांच्या अधिकार क्षेत्रात घडलेल्या व उघडकीस न आलेल्या खुनाच्या गुन्हयाचा समांतर तपास करुन नमुद गुन्हयाची उकल करण्याबाबत मीरा-भाईंदर वसई-विरारचे माननीय पोलीस आयुक्त यांनी आदेश दिले होते.
हकिगतः-
वालीव पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल झालेला होता गुन्हा रजि.नं. ३५२/२०१३ भारतीय दंड विधान संहिता कलम ३०२, ३२६ प्रमाणे गुन्हयातील फिर्यादी श्री. साजिदा महोम्मद कैयुम वय ४० वर्ष राहणार देवीपाडा गोखीवरे, तालुका वसई, जि- पालघर. यांनी आरोपी मोहम्मद अजमल महोम्मद मन्सुरी अन्सारी वय ३० वर्ष, राहणार ग्राम परहस, पोलीस ठाणे- सामनगर, ओ.पी. साफीया सराय, जिल्हा मुंगेर, राज्य-बिहार यांचे विरोधात दिनांक १४/०९/२०१३ रोजी दिलेल्या फिर्यादी वरुन सदरचा गुन्हा नोंद आहे.
गुन्हयाची उकल :-
नमुद गुन्हयाचा गुन्हे शाखा कक्ष २ वसई मार्फत नव्याने समांतर तपास सुरु करुन गुन्हयाचे फिर्यादी तसेच साक्षीदार यांचेकडे गुन्हयाबाबत मोठ्या कौशल्याने सखोल तपास करण्यात आला.
नमुद गुन्हयातील आरोपीचे जिल्हा मुंगेर, राज्य-बिहार येथील मुळ गावी गुप्त बातमीदाराकडून माहीती प्राप्त करता सदरचा आरोपी हा गुन्हा केल्यापासून त्याचे मुळ गावी गेलेला नसल्याची माहीती प्राप्त झाली.
त्यानंतर आरोपीताच्या नातेवाईकांकडे तपास करुन व तांत्रीक विश्लेषणाद्वारे आरोपीताच्या वास्तव्याबाबत माहीती प्राप्त करण्यात आली. प्राप्त झालेल्या माहीतीच्या आधारे व तांत्रीक विश्लेषणाव्दारे तपास पथक रवाना झाले व आरोपीला मिंजुरी, जिल्हा- तिरुवेल्लूर, राज्य- तामिळनाडू येथून दिनांक २४/०६/२०२६ रोजी अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष ०२ ला यश आले.
आरोपीकडे गुन्हयाबाबत तपास करता त्याने त्याची सासु गुन्हयातील मयत श्रीमती संजीदा महोम्मद कयूम वय ४० वर्ष (तत्कालीन वय) आणि त्याची पत्नी या त्याचे नवजात मुलास भेटण्या करीता देत नसल्याचा राग मनात धरुन त्याने मयत यास जिवे ठार मारल्याची माहीती कथन केली.
सदर आरोपीस गुन्हा केल्यानंतरच्या वास्तव्याच्या बाबत तपास केला असता त्याने गुन्हा केल्यानंतर तो कलकत्ता येथे त्याचे बहीणीकडे ४ ते ५ दिवस वास्तव्यास राहीला. तेथून त्याने तामिळनाडू येथे ५ ते ६ वर्ष कडीयाकाम केले. तेथून तो पंजाब येथे १ वर्ष काम करण्या करीता गेला त्यानंतर तो आतापर्यंत चेन्नई येथे पोफल या नावाने गेल्या ५ वर्षापासुन वास्तव्य करीत असल्याची माहीती सांगितली.
उपरोक्त कामगिरी मा.श्री. निकेत कौशिक पोलीस आयुक्त, श्री. संजय शिंत्रे अपर पोलीस आयुक्त, श्री. संदीप डोईफोडे पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा कक्ष २ वसईचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, सहाय्यक फौजदार संजय नवले, रविंद्र पवार, मनोज मोरे, चंदन मोरे, प्रफुल्ल पाटील, पोलीस हवालदार प्रशांतकुमार ठाकुर, सचिन पाटील, जगदिश गोवारी, राहुल कर्पे, पोलीस अंमलदार अक्षय बांगर, सर्व नेमणूक गुन्हे शाखा कक्ष ०२ वसई तसेच सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण, तसेच नेमणूक झालेले सायबर पोलीस ठाणे, मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांनी उत्कृष्टपणे पार पाडली आहे.
(सौजन्य - प्रीती तिवारी)