पोलीस उप आयुक्त मा. अकबर पठाण (अभियान), तथा कार्यकारी दंडाधिकारी बृहन्मुंबई यांचे विशेष आदेश !!

पोलीस उप आयुक्त मा. अकबर पठाण (अभियान), तथा कार्यकारी दंडाधिकारी बृहन्मुंबई यांचे विशेष आदेश !!

              ज्याअर्थी, विविध स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, शांतता व सार्वजनिक सुव्यवस्था भंग होण्याची शक्यता आहे आणि मानवी जीवन आणि मालमत्तेने नुकसान यास गंभीर धोका आहे.

            त्याअर्थी, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या नियंत्रणाखालील मुंबई विभागात सार्वजनिक शांतता बिघडणे आणि मानवी जीवितास धोका आणि मालमत्तेची हानी आणि कोणत्याही प्रकारची दंगल रोखण्यासाठी पाच किंवा अधिक व्यक्तींच्या हालचाली आणि बेकायदेशीर एकत्र येण्यावर प्रतिबंध घालण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आलेला आहे.

           म्हणून अकबर पठाण, पोलीस उप आयुक्त (अभियान), बृहन्मुंबई, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ (१९५१ चा महा. अधिनियम XXII) च्या कलम १० मधील पोटकलम (२) सह कलम ३७मधील पोटकलम (३) व्दारे त्यांना बहाल केलेल्या अधिकारांचा वापर करताना, याव्दारे १८/०४/२०२६ रोजी ००.०१ वाजले पासून सुरू होणाऱ्या आणि ०२/०५/२०२६ रोजी २४.०० वाजता संपणाऱ्या १५ दिवसासाठी संपूर्ण बृहन्मुंबई शहरात खालील प्रतिबंध लागू करण्यात आलेले आहेत.

   ते पुढील प्रमाणे

१) पाच किंवा अधिक व्यक्तींच्या कोणत्याही संमेलनास प्रतिबंध.

२) कोणत्याही व्यक्तीची कोणतीही मिरवणुक आणि कोणत्याही मिरवणुकीत लाऊडस्पीकर, वाहो, वाद्य बैंड आणि फटाके फोडण्याचा कोणताही वापर.

        आदेशात समाविष्ट असलेल्या मनाईसाठी खालील प्रमाणे सूट देण्यात आली आहे.

(अ) सर्व प्रकारचे विवाह समारंभ इ.

(ब) अंत्यसंस्कार सभा आणि स्मशानभूमी/दफन स्थळांच्या मार्गावर मिरवणूक.

(क) कंपन्या, क्लब, सहकारी संस्था, इतर संस्था आणि संघटनांची कायदेशीर बैठका,

(ड) सामाजिक मेळावे, आणि क्लब, सहकारी संस्था, इतर सोसायटया आणि संघटना यांचे सामान्य व्यवहार करण्यासाठी त्यांची बैठक.

(ई) चित्रपटगृहे, नाटकगृहे किंवा सार्वजनिक करमणुकीच्या कोणत्याही ठिकाणी किंवा त्याभोवती चित्रपट, नाटक किंवा कार्यकम पाहण्याच्या उद्देशाने संमेलने.

(फ) सरकारी किंवा निम शासकीय कार्ये पार पाडण्यासाठी सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थाची कायदे न्यायालये आणि कार्यालयामंध्ये किंवा त्याभोवती लोकांचे संमेलन.

(ग) शैक्षणिक उपक्रमांसाठी शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये किंवा त्यांच्या आसपास संमेलने.

(घ) कारखाने, दुकाने, आणि आस्थापनांमध्ये सामान्य व्यापार, व्यवसाय आणि आवाहनासाठी संमेलने,

(ह) अशी इतर संमेलने आणि मिरवणुक ज्यांना विभागीय पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई आणि त्यांचे पर्यवेक्षक अधिकारी यांनी परवानगी दिली आहे.

      वरील नमूद केलेल्या कालावधीनंतर जरी या आदेशाची मुदत संपली तरी

(अ) कोणताही तपास किंवा कायदेशीर कार्यवाही सुरू केली जाऊ शकते, चालू ठेवली जाऊ शकते किंवा लागू केली जाऊ शकते.

(ब) या आदेशाच्या कोणत्याही उल्लंघनाच्या संदर्भात झालेला कोणताही दंड, शिक्षा, जप्ती हा आदेश कालबाहा झाला नसल्याप्रमाणे लागू केली जाऊ शकते.

         माननीय अकबर पठाण यांनी हा आदेश बृहन्मुंबईत सार्वजनिक ठिकाणे, न्यायालये, सरकारी कार्यालये यांच्या सुस्पष्ट भागांमध्ये त्याच्या प्रती चिकटवून आणि लाऊडस्पीकर किंवा मेगाफोनच्या माध्यमातून तसेच उपलब्ध असलेल्या कोणत्याही स्वरूपात प्रसारमाध्यमांद्वारे प्रसिध्द करून प्रकाशित केला जाईल, असे नमूद केलेले आहे.

     सदरचा आदेश हा सही शिक्यानिशी दिनांक १६ एप्रिल, २०२६ रोजी दिला आहे.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week