घरफोडीच्या गुन्हयाची उकल १५ लाख जास्त किंमतीचे ८३ मोबाईल फोन हस्तगत ! गुन्हे शाखा कक्ष २, वसई यांची कामगिरी !!

घरफोडीच्या गुन्हयाची उकल १५ लाख जास्त किंमतीचे ८३ मोबाईल फोन हस्तगत ! गुन्हे शाखा कक्ष २, वसई यांची कामगिरी !!

घरफोडीच्या गुन्हयाची उकल १५ लाख जास्त किंमतीचे ८३ मोबाईल फोन हस्तगत ! गुन्हे शाखा कक्ष २, वसई यांची कामगिरी !!

           विरार पोलीस ठाणे येथे रजि नं १ ८२/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३). ३३३(४), ३०५(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

       या गुन्हयातील फिर्यादी श्री ऋषीकेश चेोनाराम गुप्ता वय-२४ वर्ष राहणार- सुरेश ऑटो पेट्रोलपंपाच्या बाजूला, विरार फाटा, कन्हेर, विरार पूर्व, ता वसई, याच्या शॉप नं ०७, प्रभाकर अपार्टमेंट, सिटी चार अँड रेस्टॉरंट समोर, चंदनमार रोड, विरार पूर्व या मोबाईल शॉप दुकानाचे दिनांक १६/०२/२०२६ रोजी २०.०० वाजता ते दिनांक १७/०२/२०२६ रोजी ०८.३० वाजताचे सुमारास कोणीतरी अज्ञात चोरटयाने शटरचे लॉकची कड़ी कशाने तरी तोडून दुकानात प्रवेश करुन २१,८६,०००/- रुपये किंमतीचे वेगवेगळया कंपनीचे मोबाईल घरफोडी करुन चोरून नेले होते.


         नमूदची घरफोडी ही मोबाईल दुकानात झाली असल्याने अशा प्रकारचे मोबाईल दुकानात घरफोडी करण्याची गुन्हें पार्श्वभूमी असलेल्या रेकॉर्डवरील आरोपी पप्पू ऊर्फ अजमतअली मोहम्मदअली शेख याचा शोध घेत असताना गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे सहाय्यक फौजदार श्री. मनोज मोरे यांनी गुप्त बातमीदारा कडून माहिती प्राप्त केली, त्यात सदरचा गुन्हा हा नमुद आरोपीनेच केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले व गुन्हयाची उकल करण्यात आली.


        गुन्हयातील निष्पन्न आरोपी पप्पु ऊर्फ अजमतअली मोहम्मदअली शेख, राहणार धानियचाग, नालासोपारा पूर्व ता. वसई जि. पालघर मुळ रा. भरोटीया, हेथमाली, डुमरियागंज, जि. सिध्दार्थनगर, राज्य उत्तरप्रदेश.


       नमूद गुन्हयाची उकल केल्यानंतर आरोपीने गुन्हयात चोरलेले मोबाईल हे तो ट्रॅकल्स मधून कुरीअर द्वारे त्याच्या मुळ गावी जि. सिध्दार्थनगर, राज्य उत्तरप्रदेश येथे पाठवणार असल्याचे माहीती प्राप्त झाली. चोरीस गेलेल्या मोबाईल पैकी १५,४७,६१६/- रुपये किमतीचे एकूण ८३ मोबाईल फोन जप्त करून हस्तगत करण्यात आले आहेत.


      सदरची कामगिरी मा. श्री निकेत कौशिक - पोलीस आयुक्त, मा. श्री. दत्तात्रय शिंदे - अपर पोलीस आयुक्त, मा. श्री संदिप डोईफोडे - पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मा. श्री. मदन बल्लाळ - सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा २ वसई युनीटचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक - सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक संतोष घाडगे, सहाय्यक फौजदार संजय नवले, मुकेश पवार, रविंद्र पवार, मनोज मोरे, चंदन मोरे, पोलीस हवालदार प्रफुल्ल पाटील, सचिन पाटील, जगदिश गोचारी, दादा आडके, प्रशांत ठाकुर व राहूल करें यांनी उत्कृष्टपणे पार पाडली आहे. 


        याबाबत तक्रारदाराने व मोबाईल व्यवसायिकांनी पोलीस यंत्रणेचे आभार मानले आहेत.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे