वरळीत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का !! शाखाप्रमुख सूर्यकांत कोळी यांचा राजीनामा !!

वरळीत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का !! शाखाप्रमुख सूर्यकांत कोळी यांचा राजीनामा !!

    शाखाप्रमुख सूर्यकांत कोळी यांनी सर्वच बाहेर काढले !!

         आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत उमेदवारीवरून असंतोष वाढताना दिसत असून, त्याचा पहिला फटका शाखा पातळीवर बसला आहे.

      आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत उमेदवारीवरून असंतोष वाढताना दिसत असून, त्याचा पहिला फटका शाखा पातळीवर बसला आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातील शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने वरळीतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

     आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीत राजीनामा सत्र सुरू असल्याचे पाहायला मिळाले आहे.

      वॉर्ड क्रमांक 193 साठी पुन्हा एकदा हेमांगी वरळीकर यांनाच संधी दिली जाणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर आपण नाराज झाल्याचे सूर्यकांत कोळी यांनी स्पष्ट केले आहे. 

     अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करूनही संधी न मिळाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली असून, कार्यकर्त्यांमध्ये असलेली अस्वस्थता आता उघडपणे समोर येत असल्याचे चित्र आहे.


 

        पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात सूर्यकांत कोळी यांनी वरळी कोळीवाड्यात मी गेली ४४ वर्षे पक्षाचा प्रामाणिक, स्वच्छ, मेहनती कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे, तसेच गेली १७ वर्षे शाखाप्रमुख म्हणून कार्यरत आहे. साहेब आदित्य साहेब आमचे आमदार आहेत, पक्षाची प्रतिमा मलिन होणे माझ्या रक्तात बसत नाही. पक्षाचे काम करीत असताना अनेक अडचणी आल्या मला नेहमी अंधारात ठेवून नगरसेविका सौ हेमांगी वरळीकर व तिचा पती हरीश वरळीकर हेच शाखेचे सर्वस्व असे मिरवत असायचे. मला कधीच कोणत्याही कामाला ह्यांनी पैसे दिले नाहीत फक्त सर्व माध्यमातून पैसे गोळा करण्याचे काम ह्या हरीश वरळीकरने केले आहे. फंडच्या फंड गिळंकृत केले आहेत. जो कोणी विरोधात बोलेल त्या शिवसैनिकांना मारहाण करणे, शाखाप्रमुखांच्या घरावर दगडफेक करणे, शाखाप्रमुखांना घाणेरड्या केसेस मध्ये फसवणे हा हरीश वरळीकरांचा हातखंड आहे. अनधिकृत बांधकामांचे एवढे पैसे हे हरीश वरळीकर घेतात कि संपूर्ण समुद्र किनारा डेब्रिज ने भरून गेला आहे आणि त्याला खतपाणी श्री आशिष चेम्बुरकर यांनी दिले आहे, वारंवार तक्रारी करून सुद्धा काही परिणाम झाला नाही उलट शाखेकडून कार्यकर्त्याने पाठ फिरवली. दहा वर्षात साधी शाखेची पूजा देखील ह्यांनी घातली नाही. शाखेची होत चाललेली पडझड ह्या सर्वांची जाणीव आदरणीय आदित्य साहेबाना आहे. शाखेची एकंदरीत परिस्थिती फार नाजूक आहे अनधिकृत बांधकामे, रस्त्याची झालेली दुरावस्था, ह्या सर्व कारणांमुळे वॉटर मीटर गटर ह्यावर परिणाम होऊन सर्व जनता आपल्या विरोधात गेली आहे. सर्व निरीक्षकांनी देखील ह्यांच्या विरोधात रिपोर्ट दिले आहेत ह्या सर्वांची मी जबाबदारी घेऊ शकत नाही ह्या सर्व चुकीच्या मार्गाची जबाबदारी हरीश वरळीकर ह्यांचीच आहे.

      तरी महोदय आपण पुन्हा ह्यांनाच सीट देणार असाल तर माझ्या शाखाप्रमुख पदाचा तसेच पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा स्वीकारावा हि नम्र विनंती, माझ्याकडून पक्षसेवेत कार्य करित असताना काही कमी राहिली असेल तर साहेब माफ करा, आपल्या पक्षाकडून खूप प्रेम आणि नाव मिळाले हे मी कदापिही विसरू शकत नाही.

        असे सूर्यकांत कोळी यांनी म्हटले आहे.

     विश्वसनीय सूत्रांच्या माहितीप्रमाणे सूर्यकांत कोळी हे शिवसेना शिंदे गटाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week