विठुचा मी वारकरी.....
* विठूचा मी वारकरी **
विठूचा मी वारकरी मुखी रंगतो अभंग
टाळकरी होऊनिया साथ देतो पांडूरंग. ||धृ ||
वाट चालता वारीची होते काट्याचेच फूल
नाही थकवा जिवाला पडे देहाचीच भूल
आतुरले मन माझे पाय चालण्यात दंग. ||१ ||
चित्त विटेवरी लागे विसरून व्यापताप
विठ्ठलाच्या भेटीसाठी डोळे झरे आपोआप
वाट सरता सरता भजनाला चढे रंग ||२ ||
पुढे मुर्ती विठ्ठलाची येतो भरूनिया ऊर
काकड्याच्या आरतीला माझा जळतो कापूर
पांडूरंगा विनितो मी सदा घडो तुझा संग. ||3 ||
बबन धुमाळ, रोहाऊस नंबर-21, जगतापवस्ती, वाघोली, पुणे 412207
मो नं 9284846393