निवडणूक मतमोजणी बाबत चुकीची बातमी प्रसारित करण्यात आले बाबत गुन्हा दाखल ?
निवडणूक मतमोजणी बाबत चुकीची बातमी प्रसारित करण्यात आले बाबत गुन्हा दाखल ?
दिनांक ०४/०६/२०२४ रोजी मतमोजणी प्रक्रिये दरम्यान २७ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे मतमोजणी केंद्रात मतमोजणीचे कामकाज सुरु असताना मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल फोन तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तु वापरण्यास मनाई असताना देखील सायंकाळी साधारण १६:०० वाजताचे सुमारास १५८ विधानसभा मतदार संघामधील नेमणुकीस असलेले एनकोर ऑपरेटर श्री. दिनेश गुरव यांनी त्याठिकाणी उपस्थित असलेले श्री. मंगेश पंडीलकर यांना त्यांचेकडील मोबाईल फोन हा बेकायदेशीर रित्या वापरण्याकरीता दिला. त्यावरून नमुद गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हयाचा तपास चालु असताना दैनिक लोकमत या मराठी वृत्तपत्राच्या पत्रकार श्रीमती गौरी कलगुटकर यांनी दि. १५/०६/२०२४ रोजी दैनिक लोकमत या वृत्तपत्रात 'वायकरांच्या नातेवाईकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन' तसेच Mid-day या इंग्रजी दैनिक वृत्तपत्राचे पत्रकार श्री. शिरीष वक्तानिया यांनी दिनांक १६/०६/२०२४ रोजी "Waikar's kin had phone that unlocks EVM" अशा मथळ्याखाली बातमी Mid-day या वृत्तपत्रात प्रसिध्द केली आहे. इंग्रजी वृत्तपत्र Mid-day मधील बातमीमध्ये असे नमुद केले आहे की," Police said this mobile phone was used for generating the OTP that unlocked the EVM machine, which was used inside the NESCO Centre on June 4." ही पुर्णपणे चुकीची माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तसेच वनराई पोलीस ठाण्याने कोणतीही माहिती दिलेली नसताना देखील वनराई पोलीस ठाण्याकडुन माहिती देण्यात आल्याचा चुकीचा समज निर्माण करण्यात आलेला आहे.
त्याअनुषंगाने कळविण्यात येते की, वनराई पोलीस ठाणेकडुन याबाबत कोणतीही माहिती मराठी दैनिक वृत्तपत्र लोकमत, Mid-day या इंग्रजी दैनिक वृत्तपत्रास अथवा कोणत्याही प्रसारमाध्यमास देण्यात आलेली नाही. वरील प्रसिध्द करण्यात आलेली माहिती ही चुकीची, दिशाभूल व संभ्रम निर्माण करणारी असुन मुंबई पोलीस दलाकडुन अशी कोणतीही माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात आलेली नाही, सदरविषयी कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवण्यात आलेली आहे.
गोरेगाव येथील वनराई पोलीस ठाणे गु. र. क. २०१/२४ कलम १८८ भादवि अन्वये सह लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १३४ (१) अन्वये दि. १३/०६/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.